Atal Bamboo Farming Yojana: बांबूची शेती करण्यासाठी सरकार देत आहे 7 लाखांचे अनुदान; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Atal Bamboo Farming Yojana भारत हा हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नवनवीन योजनांची आखणी करीत असतात.  केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना. महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे. बांबूपासून विविध वस्तू बनविल्या जातात आणि कमी कालावधीत येणारे आणि कमी पाण्यामध्ये मोठे होणारे ही वनस्पती असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन देखीव विविध पातळ्यांवर काम करीत आहे.

योजनेचे उद्दिष्ट

 बांबू सारख्या कमी कालावधीत मोठी होणारी वनस्पती जास्त उत्पन्न देते. बांबू पासून बनलेल्या वस्तू परदेशी बाजारात अधिक किमतीने विकल्या जातात. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून एक उत्तम रोजगाराचा मार्ग उपलब्ध करुन द्यावा असे अटल बांबू समृद्धी योजना सुरु करण्यामागे केंद्र व राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. Atal Bamboo Farming Yojana

बांबू लागवडीसाठी पोषक वातावरण

बांबू लागवडीसाठी सध्याचे पावसाळ्याचे वातावरण हे अत्यंत पोषक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेतून रोप आणि मजुरीच्या स्वरुपात बांबू लागवडीचे संगोपन करण्यासाठी टप्प्या टप्प्याने 3 वर्षापर्यंत 6 लाख 90 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून बांबूच्या विविध प्रकारांची रोपे देखील उपलब्ध करुन दिली जातात. . Atal Bamboo Farming Yojana

येथे करा अर्ज

अटल बांबू योजनेसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

अटल बांबू योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आधार कार्ड, शेतकरी असल्याचा सातबारा उतारा, जमिनीचा 8अ उतारा, अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स या  सर्व कागदपत्रांची डिजिटल कॉपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

वन विभागाने तयार केली बांबूची रोपे

भारतात प्रत्येक जिल्हानिहाय वनविभाग कार्यरत आहे. महाराष्ट्रातील वनविभागाने आतापर्यंत  बांबूची 14 लाख 67 हजार 50 विविध प्रकारची रोपे तयार केलेली आहे. ही रोपे 15 रोपवाटिकांमध्ये तयार करण्यात आलेली असून त्या त्या विभागातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने ही रोपे विकली जात आहेत. सरकारच्या या अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून बांबू लागवड देखील करण्यात येत आहे.  तसेच शासकीय जमिनीवर देखील अर्जदारांना बांबूंची लागवड करता येणार आहे. संबंधित जिल्ह्याच्या कलेक्टरकडून तसे संमती पत्रक मिळवून ही लागवड शासकीय जमिनीवर करता येणार आहे. . Atal Bamboo Farming Yojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top