पंतप्रधान किसान सन्मान निधी धारकांना आनंदाची बातमी!! 2000 रु. जमा होण्यास झाली सुरुवात, एका क्लिकवर लाभार्थ्यांची यादी पहा

सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा आर्थिक लाभ पोहोचवता यावा यासाठी सरकारने 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केली. दिनांक 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे बँक खाती नव्याने सुरु करण्यात आली. तळागाळातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना, असंघटीत कामगारांना आर्थिक साक्षरता यावी आणि डिजिटल बँकिंग कडे जास्त सकारात्मक पद्धतीने पाहिले जावे यासाठी जन धन योजना अत्यंत महत्त्वाची ठरली.

जनधन खात्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ

आता याच खात्यांमध्ये शासकीय योजनांचा आर्थिक लाक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे. 2015 मध्ये सुरु केलेली लाखो जनधन खाती आज केंद्रिय आणि राज्यांमार्फत सुरु करण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आर्थिक योजनांचा महात्वाचा भाग बनत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये सन्मान निधी केंद्रीय सरकार कडून देण्यात येतो. हे पैसे 2000 च्या टप्प्यामध्ये तीन हप्ते दिले जातात. यावेळी देखील भारतातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे ज्यांनी जन धन खाती सुरु केली आहेत त्यांच्याच खात्यात जमा होत आहेत.

किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव तपासा

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि अजूनही तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसतील तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन लाभार्थी यादी तपासू शकता.

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांची यादी तपासू शकता.

अशी तपासा लाभार्थी यादी

·      सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

·      तेथे Beneficiary List पर्यायावर क्लिक करा

·      एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या राज्याचे नाव निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा, त्यानंतर तुमची ग्रामपंचायत ज्या गावात आहे त्या गावाचे नाव निवडा

·      त्यानंतर Get report पर्यायावर क्लिक केल्यानंतर अगदी 2 सेकंदातच तुमच्या गावाची किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी समोर येईल.

·      त्या यादीमध्ये तुमचे नाव शोधा. तुमचे नाव नसल्यास Online  KYC करा म्हणजे लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top