लांब लांबचा प्रवास सुखकर करणारी आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आपल्याला रंगामुळे राज्यात लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेली लांब लांबच्या खेड्यापाड्यांचा रस्ता जोडणारी म्हणजे एसटी. महाराष्ट्रात कुठेही फिरायचं म्हटलं की एका चुटकीसरशी आठवते ती एसटी. राज्यातील एसटी सेवा ही प्रवाशांसाठी असलेला एक अनमोल ठेवा आहे. जरी आज काळ बदलत चालला असला तरी एसटी ही प्रवाशांना तीच सेवा कायम देते. एसटी महामंडळामार्फत प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता पुन्हा एका नवी योजना या यादीत समाविष्ट होणार आहे. चला तर मग या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रवाशांसाठी एसटीमार्फतच्या योजना
महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळामार्फत प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी 50% तिकिटात सवलत देण्यात येत आहे. तसेच ज्या नागरिकांचे 75 वर्ष पूर्ण आहेत, अशा नागरिकांना अगदी मोफत प्रवास एसटी महामंडळामार्फत देण्यात येत आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि अपंगांना देखील तिकिटामध्ये सवलत देण्यात येते. त्यामुळे एसटीचा प्रवास सामान्यांना चांगलाच परवडतो. त्याचबरोबर एसटी आता बऱ्याच आव्हानांना आणि स्पर्धांना सामोरे जात आहे. तरी देखील एसटीची सेवा प्रवाशांसाठी कायम आहे.
काय आहे योजना?
आता एसटी महामंडळाच्या मार्फत एका जबरदस्त योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचे नाव ‘आवडेल तिथे प्रवास’ असे आहे. खरं तर ही योजना प्रवाशांसाठी 1988 मध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु यात बदल होत गेले. या योजनेचा प्रवाशांना प्रवास करण्यासाठी देण्यात येतो. म्हणजेच की काही कालावधीसाठी या योजनेअंतर्गत प्रवाशांना पास देण्यात येतो. त्या काळामध्ये प्रवासी महाराष्ट्रभर कुठेही दौरा करू शकतात. त्यामुळे प्रवाशांना या योजनेचा सोयीस्कर आणि किफायतशीर फायदा होतो.
योजनेचा कसा मिळतो लाभ?
प्रवाशांना प्रवास करण्यासाठी 7 दिवसाचा पास या योजनेअंतर्गत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत प्रवाशांना जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवा अशा प्रकारचे विविध पास देण्यात येतात. प्रौढ व्यक्तींना चार दिवस प्रवास करण्यासाठी पास घ्यायचा म्हटलं तर 1170 रुपये द्यावे लागतात. तसेच शिवशाही आंतरराज्यासाठी 1520 रुपये लागतात. तसेच प्रवाशांनी सात दिवसांसाठी पास घेतला तर त्यासाठी 2,040 व 3,030 रुपये त्यांना मोजावे लागतात. या पाचची मुदत संपल्यानंतर प्रवासी या पासवर प्रवास करू शकत नाहीत. कारण पासवर्ड वेळ नमूद केली जाते आणि त्यानंतर तिकीट घेणे आवश्यक आहे असे लिहिले जाते.