जागतिक आणि भारतीय बाजारपेठेतील सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांसाठी कमाईच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर भूमिका बजावत असून सध्या सेंद्रिय उत्पादनांची मागणी देशातच नव्हे तर जगभरात झपाट्याने वाढत आहे.
भारतीय शेतकरी घेत आहेत सेंद्रिय उत्पादन
भारतामध्ये सध्या 25 लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत, जे जगाच्या 55 टक्के आहे. देशात सुमारे 40 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेती केली जात आहे. आज जगातील सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ 12,285 अब्ज रुपयांची झाली आहे, तर भारताच्या सेंद्रिय बाजारपेठेचे मूल्य 16 हजार 800 कोटी रुपये आहे.
सेंद्रिय शेतीला चालना देणारे प्रदर्शन
दिनांक 3 ते 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या Biofac India 2024, Natural Expo India आणि Millets India चे उद्घाटन वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या हस्ते इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे करण्यात आले. सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बर्थवाल यांनी भारतीय सेंद्रिय उत्पादनांचा निर्यात बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी लेबलिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग, लॉजिस्टिक, प्रमाणन आणि चाचणी यावर लक्ष केंद्रित करण्याविषयी देखील त्यांनी सुचित केले आहे. ज्यामुळे उद्योगाला जागतिक मानकांची पूर्तता होण्यास मदत होईल.
बायोफॅक इंडिया सेंद्रिय क्षेत्रातील आघाडीच्या आणि उदयोन्मुख ब्रँड्सचे प्रदर्शन देखील करीत आहे. भारत सरकारच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) आणि न्यूरेमबर्ग मेस इंडिया यांनी आयोजित केलेल्या बायोफॅक इंडिया 2024, नॅचरल एक्स्पो इंडिया आणि मिलेट्स इंडिया एक्स्पोमध्ये सांगण्यात आले की, भारतातील 81 टक्के सेंद्रिय उत्पादने अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात केली जातात, ज्यामध्ये बिगर बासमती तांदूळ सर्वात मोठे निर्यात उत्पादन आहे. एकूण निर्यात होणाऱ्या सेंद्रिय खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक वाटा 47 टक्के सेंद्रिय गैर-बासमती तांदळाचा आहे, ज्याची निर्यात 2023-24 मध्ये 45 हजार 149 टन झाली आहे.
सेंद्रिय अन्नाच्या गुणवत्तेसाठी 100 प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहेत
बायोफॅक इंडिया 2024 नॅचरल एक्स्पो इंडिया आणि मिलेट्स इंडियाचे उद्घाटन वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, देशातील सेंद्रिय अन्नाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 100 नवीन प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत.
एक्स्पोमध्ये 100 हून अधिक एफपीओ आणि संस्था एकत्र येत आहेत
न्यूरेमबर्ग मेस इंडियाच्या अध्यक्षा सोनिया पाराशर यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीशी संबंधित १०० हून अधिक FPO/FPCs या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. त्या म्हणाल्या 2023-24 मध्ये भारताची सेंद्रिय अन्न निर्यात अंदाजे US$ 494.80 दशलक्ष झाली आहे. बायोफॅक इंडियाने भारतीय सेंद्रिय बाजारपेठ जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, याबाबत त्यांनी अभिमान व्यक्त केला.
3-दिवसीय प्रदर्शनामध्ये सेंद्रिय कच्ची आणि प्रक्रिया केलेली उत्पादने, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, बाजरी, बायो-इनपुट, पॅकेजिंग आणि ट्रेसेबिलिटी सोल्यूशन्सचे प्रदर्शन केले जाईल. या तीन दिवसीय प्रदर्शनात, जागतिक उद्योग तज्ञ सध्याची कृषी क्षेत्रापुढे असलेली आव्हाने आणि भविष्यातील सेंद्रिय शेती आणि शाश्वत पद्धती यावर विचारमंथन करतील.