केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला रेशन कार्डवर स्वस्त अनुदान या देण्यात येते. परंतु आता केंद्र शासनाच्या निर्णयानंतर देशात पुढील पाच वर्षे अंत्योदय योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अशातच आता रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेशन धारकांना गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर सरकारकडून एक भेट मिळणार आहे. त्यामुळे रेशन धारकांचा गणेशोत्सवाचा सण आणखीच गोड होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन धारकांना सणासुदीला आनंदाचा शिधावाटप करण्यात येतो. या शिधाची किंमत केवळ शंभर रुपये इतकी आहे. परंतु यामध्ये मिळणारे अन्नधान्य हे अधिक किमतीचे असते. आता गणेशोत्सवाचा सण येणार असून त्यासाठी राज्य शासन रेशन धारकांना हा आनंदाचा शिधा देणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये राज्यातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किती रुपयांना मिळणार आनंदाचा शिधा?
गौरी गणपती आणि गणेशोत्सवासाठी रेशन धारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. त्याचं कारण म्हणजे गरीब कुटुंबांना देखील हा सण गोड करता यावा. या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर तेल या वस्तू मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे. या आनंदाच्या शिधाचे वाटप 15 ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये केले जाणार आहे. म्हणजेच हा आनंदाचा शिधा महिनाभर वाटप केला जाणार आहे.
आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय
राज्यातील रेशन धारकांना सणासुदीला हा आनंदाचा शिधा मिळावा म्हणून शिंदे आणि फडणवीस या सरकारने हा निर्णय घेतला होता. राज्य शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर 2023 मध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याची योजना आणली. शंभर रुपयांच्या शिधामध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत ही बाजारभावाप्रमाणे 315 रुपये इतकी असते. परंतु रेशन धारकांना हा शिधा अवघ्या 100 रुपयात देण्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.