SBI Bank Scheme: स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी भारतातील सर्वात मोठी बँक आहे. SBI च्या भारतात 22,405 शाखा आहेत. ही बँक ग्राहकांच्या अद्ययावर बँकिंग सुविधा प्रदान करते तसेच ग्राहकांना बचतीची सवय लागावी यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत आहे. तुमचे जर का स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुम्हाला SBI च्या या नवीन योजनांबद्दल माहिती असायलाच हवी. कारण या योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.
कोणत्या आहेत त्या तीन योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या उत्तम बचतीसाठी महत्त्वाच्या तीन योजना राबवल्या जातात. त्या म्हणजे. एसबीआय अमृत कलश योजना, एसबीआय सर्वोत्तम योजना आणि एसबीआय अमृत वृष्टी योजना. या तीन योजनांबद्दल एसबीआच्या प्रत्येक ग्राहकाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुम्ही उत्तम गुंतवणूक करु शकता आणि त्यातून उत्तम परतावा देखील मिळवू शकता.
एसबीआय अमृत कलश योजना SBI Amrit Kalash Scheme
स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या या योजनेत लाखो लोकांनी नफा कमावला आहे, कारण तुम्ही या योजनेत 20 सप्टेंबर 2024 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. जर उपलब्ध योजनांबद्दल बोलायचे झाले तर त्यात 7.10 टक्के व्याज दिले जाईल. अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी 400 दिवसांचा आहे. यामध्ये ग्राहकांना निश्चित परतावा मिळेल ज्याची बँकेने हमी दिली आहे. SBI Bank Scheme
एसबीआय अमृत वृष्टी योजना – SBI Amrit Vrishti Scheme
या योजनेअंतर्गत तुम्हाला 444 दिवसांत 7.25 टक्के व्याजाचा लाभ मिळेल, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाने पैसे जमा केल्यास 7.75 टक्के व्याज मिळेल, त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला निश्चित व्याज मिळत. या सर्व योजनांचा बाजाराच्या हालचालीशी काहीही संबंध नाही.
एसबीआय सर्वोत्तम योजना – SBI Sarvottam Scheme
एसबीआयच्या सर्वोत्तम योजनेमध्ये पैसे बचत केल्यास सर्वसामान्य ग्राहकांना 7.4 टक्के व्याज, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. ही एक उत्तम परतावा देणारी योजना मानली जात आहे. अनेक ग्राहक या योजनेच पैसे बचत करण्याचा निर्णय घेत आहेत. SBI Bank Scheme