केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला उपयोगी पडतील अशा योजना राबवल्या जातात. विशेषता स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव करत आहे. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. परंतु तरी देखील केंद्र शासनाने राबवलेली आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे योजना ‘लखपती दीदी योजना’ (Lakhpati Didi Yojana) जबरदस्तच आहे. चला तर मग ‘लखपती दीदी योजना’ काय आहे? हे जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना भेट देण्यासाठी 15 ऑगस्ट 2023 रोजी ‘लखपती दीदी योजना’ या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. इतकच नाही, तर या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात येते. या पाच लाख रुपयांच्या कर्जांमधून महिला आपल्या रोजगाराची निर्मिती करू शकतात. म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. आता केंद्र शासनाच्या माध्यमातून लखपती दीदी योजनेचे टार्गेट देखील वाढवण्यात आले आहे. पूर्वी या योजनेचे टार्गेट 2 कोटींचे होते आता त्यावरून 3 कोटी करण्यात आले आहे.
लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय?
तुम्हाला जर लखपती दीदी योजनेचा लाभ घयचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेसाठी दिलेली पात्रता पूर्ण करावी लागेल. अर्ज करणारी महिला कायमची भारताचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. खर्च करणाऱ्या महिलेचे वय किमान 18 आणि कमाल 50 असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्ज करणारी महिला बचत गटांमध्ये असणे अनिवार्य आहे. जी महिला बचत गटांमध्ये असेल अशाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला जर लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे:-
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईझ फोटो
ई-मेल आयडी
बँक खाते
आधार कार्ड
पॅन कार्ड
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
लखपती दीदी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास या ऑफिसमध्ये जावे लागेल.
या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तेथून ‘लखपती दीदी योजने’चा फॉर्म घ्यावा लागेल.
या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितरीत्या भरावी त्यानंतर वर दिलेली आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडावीत.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला महिला व बालविकास या कार्यालयात तो सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पोहोच पावती दिली जाईल.