अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दुसरीकडे होणारे हे शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसानीसाठी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देते. त्याचवेळी राज्यात जानेवारी ते मे या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कोट्यवधींचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मान्यता
जानेवारी ते मे हे महिने थंडी आणि उन्हाळ्याचे असतात. त्यामुळे शेतकरी या ऋतूत येणारी पिके लावतात. परंतु अवेळी होणाऱ्या पावसामुळे या शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे जर शेती पिकांचे अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना ‘राज्य आपत्ती प्रतिसाद निधी’ यामधून आर्थिक मदत करण्यात येते. त्याचवेळी जानेवारी ते मे महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई म्हणून तब्बल 596 कोटी 21 लाखांचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.
आता 3 हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना या निधीमधून आर्थिक मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 12 नैसर्गिक आपत्ती मंजूर केले आहेत. ज्यामध्ये राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग यामध्ये नुकसान झाल्यास नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना अवेळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्यात येते. आता याच मदतीमध्ये वाढ करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधी 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळत होती. आता त्यामध्ये वाढ करून 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत सुधारित दराने नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम
जानेवारी ते मे त्या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा झाल्यास मेसेज येईल.