केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा पुरेपूर वापर करून देशातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा या योजना सुरू करण्यामागे उद्देश आहे. आज जर कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटलं तर त्यावर सरकार तुम्हाला अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांना आता व्यवसाय करणे सोयीचे झाले आहे. आता सरकारने झेरॉक्स मशीनवर (Xerox Machine Subsidy) शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता स्वतःचा व्यवसाय सुरू करून ते त्याच्या झेरॉक्स मशीनमधूनही उत्पन्न मिळवणे सोपे झाले आहे. चला तर मग झेरॉक्स मशीनसाठी अनुदान कसे मिळवावे हे पाहुयात.
कोणाला मिळणार झेरॉक्स मशीनवर अनुदान?
सध्याच्या काळात पाहिलं तर सुशिक्षित आणि अशिक्षित नागरिक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. बेरोजगारीची वाढती संख्या कमी करण्यासाठी सरकार प्रत्येक गोष्टीवर अनुदान देत आहे. या अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करून सरकार बेरोजगारांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे सरकार दिव्यांग नागरिकांकडेही चांगले लक्ष देत आहे. त्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सरकारने दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय करायला यावा आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी झेरॉक्स मशीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
100% अनुदानावर झेरॉक्स मशीन
सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत झेरॉक्स मशीन अनुदान या योजनेला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन मिळते. जर समजा एखादी झेरॉक्स मशीनची किंमत एक लाख रुपये असेल, तर लाभार्थ्याला एक लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला या योजनेचा फ्री मध्येच लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
झेरॉक्स मशीनसाठी 100% अनुदान हवे असल्यास अर्ज करणाऱ्या व्यक्ती दिव्यांग असावा. तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे दिव्यांगचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जर अर्जदार व्यक्तीकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसेल तर तो या योजनेसाठी पात्र नसणार आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे ते पुढील प्रमाणे:-
आधार कार्ड, पॅन कार्ड, संपूर्ण नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, ग्रामसभेचा ठराव ही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत भरावी लागणार आहेत. हा अर्ज तुम्ही समाज कल्याण विभागामध्ये भरू शकता.