Success Story | शेती करणं सोपं नाही, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी केलेली बरी, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण शेती करण्यासाठी खूप कष्टही लागते आणि शेतीमध्ये पैसाही तेवढा मिळत नाही, असे बोललेले तुम्ही ऐकलेच असेल. पण आता कितीतरी सुशिक्षित नोकरदार तरुण नोकरी सोडून शेती व्यवसाय करत आहेत. यात शेती व्यवसायातून वर्षाला कोट्यवधींचा नफा कमावत देखील आहेत. कारण नोकरीमधून मर्यादितच पैसा मिळतो तसा व्यवसायातून जबरदस्त नफा मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुशिक्षित तरुणाची यशोगाथा (Success Story) सांगणार आहोत ज्याने नोकरी सोडून शेती (Agriculture) करणे ठरवले. ज्याने आता शेती क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय
हृदय नारायण दुबे या तरुणाचे शिक्षण एमसीए (मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) पूर्ण झाले आहे. आता इतकं शिक्षण झालं म्हटल्यावर या तरुणाला नोकऱ्यांच्या आहे खूप ऑफर्स मिळाल्या. आता शिक्षण केले म्हटल्यावर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी देखील गेले. इतकंच नाही तर, या तरुणाने इंजीनियरिंग क्षेत्रातील शिक्षक म्हणून देखील नोकरी केली. अशा चांगल्या नोकऱ्या सोडून हृदय दुबे या तरुणाने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
बांबूची शेती करून शेती क्षेत्रात उमटवला ठसा
इंजिनीयरची नोकरी सोडून बांबूची लागवड करायची आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा ध्यास हृदय दुबे यांनी घेतला. त्याचवेळी त्यांनी घरच्यांसमोर बांबू लागवडीचा प्रस्ताव सांगितला. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना बांबूची शेती जरा विचित्र वाटली. असे असूनही त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवत बांबूची लागवड केली. खरं सांगायचं झालं तर हृदय-दुबे यांनी बांबू लागवडीसाठी कुठेही प्रशिक्षण घेतले नाही. त्यांनी केवळ youtube च्या माध्यमातून व्हिडिओ पाहून बांबू शेतीची लागवड केली.
बांबू शेतीतून लागवडीतून 100 वर्षांपर्यंत नफा
हृदय दुबे यांनी सीमाभागातील गुलारभर गावात तीन एकर जमिनीवर बांबू लागवड सुरू केली आहे. हृदय दुबे यांना असा विश्वास आहे की भविष्यात या शेतीमुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांबूची लागवड तुम्ही कोणत्याही जमिनीवर करू शकता. अगदी ओसाड जमिनीवर देखील बांबूची शेती चांगल्या प्रकारे होते. बांबू शेतीचे आयुष्य 90 ते 100 वर्षे इतके असते. बांबूच्या शेतीला दीर्घायुष्य असते याचमुळे शेतकऱ्याला देखील दीर्घकाळापर्यंत या शेतीचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून वापर होतो. तसेच बांबूची लागवड एकदाच करावी लागते त्यानंतर वेळोवेळी कापणी केल्यानंतर पुन्हा बांबू चे झाड फुटते. एकंदरीत सांगायचं झालं, तर एकदा गुंतवणूक केल्यानंतर 90 ते 100 वर्षे तुम्हाला नफा मिळतो.