मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 1.55 लाख कोटींचा पिक विमा मंजूर; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे 

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. हेच नुकसान भर भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास अर्थसाहाय्य दिले जाते. आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात या पिक विमा च पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊयात हे पैसे कधी जमा होणार आहेत.

crop insurance news
crop insurance news

शेतकऱ्यांना 1.55 लाख कोटींचा पिक विमा मंजूर 

शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी पूर्वी क्लेम करावा लागत होता. हा क्लेम पीक निहाय असायचा त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहायचे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ एका रुपयात पिक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे राज्यात पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची झपाट्याने संख्या वाढली.

यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळू लागली. अशातच आता 1 लाख 55 हजार कोटींचा पीक विमा मंजूर झाला आहे. आता लवकरच हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

कधी येणार खात्यात पैसे? 

शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे आधार संलग्न खात्यामध्ये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा व्यवस्थित भरला गेला आहे अशा शेतकऱ्यांना गुरुवारी 1 ऑगस्ट आणि शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी पिक विम्याची रक्कम खात्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे. याबाबतची माहिती थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आता आपण तालुका निहाय शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळाली आहे याबाबतची माहिती पाहूयात. 

कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळाले पीक विम्याचे पैसे? 

तर शेतकरी मित्रांनो हवेलीतील जवळपास 1391 शेतकऱ्यांना 19.20 इतकी मदत मिळाली आहे. तर खेड तालुक्यातील 15,335 शेतकऱ्यांना 6,60.31 इतकी मदत मिळाली आहे. तसेच आंबेगाव तालुक्यातील 13,944 शेतकऱ्यांना 4,23.68 इतकी मदत मिळाली आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील 27793 शेतकऱ्यांना  13,85.88 इतकी मदत देण्यात आली आहे.

तसेच शिरूर तालुक्यातील 24,533 शेतकऱ्यांना 4,97.29 इतकी मदत देण्यात आली आहे. पुरंदरमधील 13,307 शेतकऱ्यांना 2,50.00 इतकी मदत प्रदान करण्यात आली आहे. दौंडमधील  2792 शेतकऱ्यांना 54.26 मदत मिळाली आहे. तसेच बारामती तालुक्यातील 19,430 शेतकऱ्यांना 6,69.50 इतकी मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील 7075 इतक्या शेतकऱ्यांना 2,53.78 इतकी मदत देण्यात आली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top