व्हिएतनाम नारळाचं उत्पन्न चांगलं आहे पण तुमच्याकडे त्यासाठी मार्केट पाहिजे. विकत घेणारे असले पाहिजे. नारळ साईज ने मोठा आहे. याचा मातृवृक्ष मोठा आहे. आणि असे म्हणतात की जर मातृवृक्ष मोठा असेल तर त्याला उत्पन्न चांगलं येते. म्हणजे ओरिजनल नारळ जर मोठा असेल तर त्याची प्रजाती पण चांगली मोठीच असणार.
याची रोप जर का तुम्ही लावली तर लागवडीच्या साडेतीन ते चार वर्षानंतर उत्पन्नावर येतील. याची उंची नारळ येण्याची साडेतीन ते चार फूट असेल. सुरुवातीला यात नारळ कमी येतात नंतर मग उत्पन्न हळूहळू वाढेल.
याची लागवड 25 x 25 वर करणे योग्य. 10 x10 व लागवड केली तर नारळाची गर्दी खूप होते घनता डेन्सिटी खूप जास्त होते. वार पण खेळत राहत नाही. आणि मग परागीभवन कमी होते आणि परागीभवन कमी झाल्यामुळे नारळांची संख्या पण पुढे जाऊन कमी होणार. १५x१५ वर 190 रोप लागतात.
25 x 25 वर 70 रोप लागतात, जास्त नारळ लावून उत्पन्न कमी येणार त्यापेक्षा कमी नारळ लावून चांगल्या क्वालिटीचे नारळ विकून जास्त उत्पन्न येण्याची शक्यता आहे. कारण जर का कमी झाड असतील तर हवा खेळती राहील आणि परागीभवन होईल.
याची लागवड कशी करायची?
३ फूट x ३ फूट x ३ फूट चा खड्डा खाणून घ्यायचा. त्यात सुरुवातीला पालापाचोळा टाकायचा एक किलो मीठ टाकायचं. हे मीठ जेवणाचं मीठ नाही तर जाड मीठ कारण हे मीठ पाणी धरून ठेवतं त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. पालापाचोळा टाकल्यानंतर जर तुमच्याकडे फिश किंवा चिकनच काही वेस्ट असेल जे की मोफत मिळतं तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता हे तुम्ही चार-पाच किलो किंवा दहा किलो तुम्ही त्याच्या एकदम तळाशी टाका.
कारण हे जेव्हा कुजतं तेव्हा त्याचं खत चांगलं बनते. याच्यासारखं खत दुसरं एवढं चांगलं नसतं कारण याच्यातून झाडाची वाढ चांगली होते. ही वेस्ट तुम्ही टाकल्यानंतर त्याच्यावरती मातीचा एक लेयर पुन्हा टाका. त्यावरती तुमची जी बाहेरची माती आहे त्यामध्ये एक किलो मीठ, खत आणि रेती.
रेती टाकण्यामागचं कारण असं की माती जेव्हा पाण्याने भुसभुशीत होते आणि त्यानंतर ते घट्ट होते आणि एकदम घट्ट जर माती असेल तर ते झाडाच्या मुळासाठी चांगले नाही त्यामुळे वाळू जर का टाकली तर ती मातीला पूर्णपणे घट्ट होऊ देणार नाही आणि एक पोकळी नेहमी ठेवेल त्यामुळे रेतीसुद्धा टकणे गरजेचे आहे. कारण एक स्मूथ मोमेंट त्याच्या मुळाना मिळते. म्हणून मीट आणि रेती टाकलीच पाहिजे.
या नारळात पाणी किती मिळेल?
या नारळामध्ये 400 ते 500 एम एल पाणी मिळू शकते