मित्रांनो 35 ते 40 दिवसाच्या कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणजे कोथिंबीर, उन्हाळी कोथिंबीरआणि याच्यात नफा सुद्धा चांगला आहे.
उन्हाळी कोथिंबीर लागवड
जमीन कशी निवडावी
मित्रांनो कोथिंबीर साठी जमीन ही भारी आणि पाण्याचा निचरा होणारी निवडावी कारण पाणी जर का एका ठिकाणी साठलं तर कोथिंबीर पिवळी पडेल आणि त्यामुळे कोथिंबीर खराब होते. भारी जमीन ही कमी तापते म्हणून उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मरण्याचे कमी शक्यता असते.
बियाणे निवड
बियाणे नेहमी जवळच्या शेतकऱ्याकडूनच घ्यावे किंवा दुकानदाराकडून. कारण दुसरीकडून जर का घेतले आणि तिथल्या प्लॉटवर जर का करपा भूरी आणि मर रोग आला असेल तर आपल्या प्लॉटवर सुद्धा हे रोग येण्याची दाट शक्यता आहे.
बियाणे किती खरेदी करावे
मित्रांनो एकरी बियाणे हे 35 ते 40 किलो वापरावे. एक किलोला दहा ते बारा कॅरेट माल निघत असतो. आणि उन्हाळ्यात कमी माल निघत असतो. आणि त्यात गट येण्याची शक्यता असते.
बीज प्रक्रिया
मित्रांनो बी पेरण्याआधी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर आठ ते नऊ दिवसानंतर हळूहळू पान फुटायला लागतात. रोप दिसायला लागतात. आता हे आठ ते नऊ दिवस बी जमिनीमध्ये कुजू नये यामुळे बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
कोथिंबिरीची वेळ
उन्हाळी कोथिंबीर 10 मार्च ते 25 एप्रिल पर्यंत हा चांगला काळ असतो. यामुळे कोथिंबीरला भाव पण चांगला मिळतो. मित्रांनो कोथिंबीर चे बी म्हणजे धन हे आपल्याला जास्त खोलात टाकायचा नाहीये दोन ते तीन इंच फक्त टाकायचे आहे. दोन ओळीतला अंतर नऊ इंच. याची पेरणी आपण बैलाच्या साह्याने किंवा छोटा ट्रॅक्टरचा वापर करून करू शकतो.
पाणी कधी द्यावे
मित्रांनो कोथिंबीर ला पाणी देण्याची वेळ ही कमी तापमानाच्या वेळी दिले पाहिजे. म्हणजे सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी दिले पाहिजे कारण जेव्हा जास्त तापात पाणी दिले तर कोथिंबीर मरण्याची शक्यता असते. म्हणून जमीन तापलेले असताना पाणी देणे टाळावे. यासाठी स्प्रिंकलरचा सुद्धा वापर करू शकता.
कोथिंबीर वर येणारे रोग
कोथिंबिरीवर रशशूकडी रोग घेऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशक चा वापर तुम्ही करू शकता. कोथिंबीर वर करपा आणि मर रोग हे येऊ शकतात.
खर्च आणि उत्पादन
- काढणीचा खर्च आपल्याला लागत नाही कारण व्यापारी स्वतः येऊन घेऊन जातो. पण पेरणी पासून ते काढायला येईपर्यंतचा खर्च हा आपल्यालाच घ्यावा लागतो.
- जमिनीच्या मशागतीला एका एकरामाग दीड एक हजार रुपये खर्च येतो.
- बियाणे 200 रुपये किलो प्रमाणे 40 किलो चे झाले आठ हजार रुपये एक एकर साठी.
- ट्रॅक्टरने पेरणी करायची म्हणलं तरी एक एकर साठी हजार रुपये.
- खताचे दीड हजार रुपये एका पोत्याचे असे दोन पोते वापरायचे म्हणले तर तीन हजार रुपये.
- जर का दोन वेळेस खुरपणी करायची असेल तर चार हजार रुपये जातात एका खुरपणीला दोन हजार रुपये.
- फवारणी चे तीन हजार रुपये म्हणजेच एका फवारणीचे एक हजार रुपये आपण पकडले आहे.
- तर सगळ्या मिळून खर्च 20000 च्या आसपास होतो.
नफा किती होईल
एका एकरामध्ये आपण समजा साडेतीनशे कॅरेट उत्पादन घेतले. आणि समजा दोनशे रुपये आपल्याला भाव लागला तर २००x ३५०= ७०,००० असे आपले उत्पादन असेल आणि त्यातून 20000 आपला खर्च आहे तर 50 हजार रुपये जवळपास निवळ नफा असू शकतो.