सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोजच्या वापरात लागणारे तेल मागच्या काळात महाग झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. परंतु आता या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे आता तेलाच्या डब्याची (Edible Oil Rate) किंमत कमी झाली आहे. तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे पुरुष वर्गाच्या खिशाला देखील आराम पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात तेलाच्या डब्याचे दर (Edible Oil Price) किती रुपयांनी कमी झाले आहेत.
खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सामान्यांना दिलासा
सध्याच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बिग बजेट बिघडले आहे. रोजच्या जेवणात तेल हा प्रचंड महत्त्वाचा घटक आहे. कारण तेलाशिवाय अन्न बनवणे शक्यच नाही. तेच तेल महाग असल्यामुळे सर्वसामान्यांना नाईलाजाने तेलावर अधिकचा खर्च करावा लागत होते. त्यामुळे त्यांचे बजेट कोलमडले होते. परंतु आता तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. लग्नसराईमुळे तेलाच्या दरामध्ये वाढ झाली होती. पण आता त्यामध्ये नरमाई दिसून येत आहे.
खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय
शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाच्या डब्याच्या दरात 2 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे गेला काही काळात या तेलाच्या दरामध्ये पाच रुपयांची वाढ झाली होती. खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात रहावे यासाठी सरकार देखील अतोनात प्रयत्न करत आहे. खरं तर केंद्र सरकारकडून दोन वेळा खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. ही केलेली कपात केंद्र सरकारने लोकसभेच्या तोंडावर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा थेट नागरिकांना मिळणार आहे, याबाबतची चर्चा सुरू आहे.
किती आहेत खाद्यतेलाचे नवे दर?
आता सध्या खाद्यतेलाचे दर कसे आहेत हे पाहूयात. तर सोयाबीन तेलाचा नवीन डबा घ्यायचा म्हटलं तर 1 हजार 590 रुपयांना झाला आहे. तर सूर्यफूल तेलाचा डबा 1 हजार 600 रुपयांना झाला आहे. दुसरीकडे शेंगदाणा तेलाचा डबा 2 हजार 340 रुपयांना झाला आहे. आता खाद्य तेलाचे दर पुन्हा कमी झाल्याने गृहिणी पुन्हा चमचमीत मेजवानी बनवायला तयार होतील. तसेच जर खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या तर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार नाही