राज्य सरकार राज्यातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही योजना सुरू करताना महिलांसाठी आणखी एका योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. आता यात संदर्भात महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना हे मोफत गॅस कधीपासून मिळणार आहे याची तारीख समोर आली आहे. चला तर मग याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
1 आक्टोबर पासून मिळणार मोफत गॅस
महिलांच्या समीक्षक कारणासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. या मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरमुळे महिलांना घरगुती आर्थिक खर्चाला हातभार लागणार आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना 1 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना 1 ऑक्टोबर पासून मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
कसे मिळणार मोफत गॅस सिलेंडर?
देशात केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस दिले जातात. त्याचबरोबर गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे. यातच भर टाकण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारचे तीनशे रुपये आणि उर्वरित 300 रुपये आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 500 रुपये अशाप्रकारे महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. केंद्र सरकारचे 300 रुपये सबसिडी मिळून महिलांना उर्वरित 500 ते 550 रुपये रक्कम भरावी लागत होती जे आता भरावी लागणार नाही.
कोणाला मिळणार लाभ?
राज्यात मुख्यमंत्री आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एक ऑक्टोबर 2024 पासून मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की या योजनेची अंमलबजावणी ही एक ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे ही बातमी महिलांसाठी आनंदाचे आणि फायद्याची ठरणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणे अनिवार्य आहे.