राज्य सरकारकडून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ सुरू केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या स्वरूपाचे लाभ मिळत आहेत. बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपयांपर्यंत देण्यात येत होते. मात्र यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. चला तर मग बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जागा घेण्यासाठी आता किती अनुदान मिळणार आहे, तसेच यासाठी पात्रता काय आहे हे जाणून घेऊयात.
बांधकाम कामगार योजना
सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांपैकी एक असलेली बांधकाम कामगार योजना ही योजना कामगारांचे जीवनमान उंचावणारी आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हालाही जागा खरेदी करायची असेल तर तुम्ही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. केवळ जागा खरेदी करण्यासाठीच नाही तर घर बांधण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी ही योजना प्रचंड फायद्याची आहे.
बांधकाम कामगाराची नोंदणी असणे आवश्यक
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जागेसाठी अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सरकारी कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांचा सही शिक्का असलेले 90 दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नाही केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि सरकारी कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांचा सही शिक्का असलेले 90 दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे असल्यावर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होते. कागदपत्रे नसतील तर त्यामध्ये तफावत आढळू शकते.
जागेसाठी किती मिळणार अनुदान?
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जागा घेण्यासाठी यापूर्वी 50 हजार रुपये मिळत होते. परंतु आता राज्य सरकारने त्यामध्ये वाढ करून ही रक्कम 1 लाखापर्यंत वाढवण्यात आले आहे. एकच नाही तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना घरे बांधण्यासाठी देखील अनुदान देण्यात येते. घर बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत एकूण 2 लाख 50 हजार रुपये देण्यात येतात.
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेच्या https://mahabocw.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तेथे प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला एक रुपया पेमेंट भरून ते सक्रिय करावे लागेल.
अशाप्रकारे तुम्ही बांधकाम कामगारची नोंदणी करू शकता.