या तारखे आधी लाडक्या बहीणींच्या खात्यात होणार पैसे जमा !

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आणि महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना अत्यंत आनंद झाला. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री आजित पवार यांनी या योजनेविषयी माहिती दिली. तसे 1 जुलै 2024 पासून योजनेला लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट 2024 असून आतापर्यंत तब्बल दीड कोटी महिलांनी अर्ज सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी या योजनेबद्दल नवनवीन नियम आणि अपडेट्स ऐकायला मिळतात. परंतु आम्ही तुमच्यासाठी काही खास बातमी घेऊन आलो आहोत.

रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार पैसै

मुख्यमंजत्री माझी लाडकी बहिण योजना ही खास महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3000/- रुपये महिलांना रक्षाबंधन सणाच्या आधीच म्हणजे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत  लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असेही संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महिलांच्या खात्यात 1 रुपया होणार जमा

सुरुवातीची तांत्रित पडताळणी करण्यासाठी शासनाकडून पात्र महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा केला जाणार आहे. निवडक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर निधी जमा केला जाणार आहे त्यानंतर खात्याची पडताळणी झाली की, जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.ladki bahin yojana payment

अर्जांची छाननी सुरुच

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 ठरविण्यात आली आहे, जुलैच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता त्यांच्या अर्जांची छाननी सुरु झाली आहे. तब्बल दीड कोटी महिलांनी आतापर्यंत अर्ज सादर केले असून त्यापैकी केवळ 50 लाख महिला पात्र ठरल्याचे सांगण्यात येत आहे. छानणी दरम्याने अर्जदारांनी शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे  अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्याचे निर्दशनास येत आहे. उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला अनेक अर्जासोबत नसल्याचे छाननी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या अर्जांची छाननी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरुच राहिल असे देखील सांगण्यात येत आहे.ladki bahin yojana payment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top