केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही तितक्यात उत्सुक आहेत. त्यामुळे सरकारच्या या योजना देशभरात नावाजल्या जात आहेत. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम केले जाते. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. आता महिलांना तिसरा हप्त्याचे प्रतीक्षा आहे. म्हणजेच महिला तिसऱ्या हप्त्याचे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे.
कधी होणार तिसरा हप्ता खात्यात जमा?
असे बोलले जात आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेपर्यंत जमा होऊ शकतो. परंतु यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पात्र असून देखील महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. कारण महिलांना डीबीटी द्वारे या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जरी सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख निश्चित झालेली नसली तरीदेखील या महिन्यात लवकरच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्यामुळे महिलांनी आपले राहिलेली उर्वरित कामे झटपट करून घेणे आवश्यक आहे तरच त्यांना या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
या महिलांना मिळणार 4 हजार 500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑगस्ट अखेरपर्यंत आपले अर्ज जमा केले आहेत अशा महिलांना या महिन्यात 4 हजार 500 मिळणार आहेत. हे 4 हजार 500 महिलांना तीन हप्त्याचे एकदम मिळणार असून, त्यांच्या खाते आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट पासून जमा करण्यात आला होता.