Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील राबविण्यात येतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. चला तर मग राज्य पुरस्कृत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिक माहिती मिळवूया.
नमो शेतकरी महा सन्मान निधी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्यात येतात.
हे पैसे 4 महिन्यांमध्ये 2000 रुपयांच्या हप्ता अशा पद्धतीने वर्षभरात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 हप्ते जमा होतात. आतापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अशापद्धतीनेच राज्यांतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000रु देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
केंद्र आणि राज्यांचे मिळून 12000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार
केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6000 रुपये वार्षिक असे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला दोन्ही योजनांचे मिळून 12000/- रुपये जमा होतात. Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी महासन्मान निधीची पहिला हप्ता
2024 च्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना जाहिर केली आणि 28 फेब्रुवारी 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता 2000 रुपयांचा जमा देखील झाला. आता चौथा हप्ता राज्यभरातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलै पर्यंत जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे तुमच्या खात्यात चौथा हप्ता जमा झाला नसल्यास तुम्ही काही काळ वाट पाहून ऑनलाईन KYC करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील.