पीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी; 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम आता मिळेल फक्त तीन दिवसांत

प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees Provident Fund Organisation मध्ये पीएफ खाते असते. या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.  यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संस्थेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पिएफमधील पैले लवकर मिळवावे यासाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे.यामुळे आधी पैसे काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागत असत तेच काम आता 3 दिवसांत होणार आहे. या सुविधेमुळे तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲडव्हान्स क्लेमची वाढवली मर्यादा

अलीकडेच ॲडव्हान्स क्लेमची मर्यादा वाढवली होती ज्यामुळे आता पीएफ खातेदारांना अवघ्या तीन दिवसांत आपल्या पेन्शन खात्यातून लाखो रुपये काढण्याची सुविधा मिळणार आहे. ईपीएफ खात्यातून ॲडव्हान्स पैसे काढण्याची मर्यादा संस्थेकडून ठरविण्यात येते ती आधी 50 हजार रुपयांपर्यंत होती परंतु आता नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पिएफ खात्यात 1 लाखापर्यंत रक्कम आगाऊ पद्धतीने काढता येणार आहे. PF Advance Claim

पेन्शन खात्यात आगाऊ पैसे काढण्याची मान्यता कोणाल आहे?

 भविष्य निर्वाह निधीच्या ऑटो क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया एप्रिल 2020 म्हणजे करोना काळत निर्माण झालेल्या  आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत सुरू करण्यात आली होती, पण त्या वेळी केवळ वैद्यकीय कारणांमुळेच लोकांना आगाऊ पैसे काढण्याची परवानगी होती. अशा स्थितीत, अलीकडेच ईपीएफओने या सुविधेची व्याप्ती वाढवली. या अंतर्गत आता एखादा पीएफ खातेदार आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी EPF मधून पैसे काढू इच्छित असेल तर त्याला ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत.

पीएफओ खात्यातून काढता येईल इतकी रक्कम

कर्मचारी भविष्य निधी संगठन मंत्रालयामार्फत करण्यात आलेल्या बदलानंतर आता EPF खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम करण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. याआधी ही रक्कम 50 हजार रुपये इतकी होती. ऑटो सेटलमेंट मोडद्वारे आगाऊ निधी काढता येईल ज्यासाठी कोणत्याही अतिरिक्त परवानगीची गरज नसून फक्त तीन दिवसात पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या प्रक्रियेसाठी  KYC, दाव्याच्या अर्जाची पात्रता, बँक खात्याचा तपशील आवशयक आहे. PF Advance Claim

पीएफ खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया जाणून घ्या-  How to Claim PF Advance

·      कर्मचारी भविष्य निधी संघठन या वेबसाईटला भेट द्या https://unifiedportal-emp.epfindia.gov.in/epfo/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता

·      सर्वप्रथम UAN आणि पासवर्डद्वारे EPFO पोर्टलवर लॉगिन करा.

·      त्यानंतर ऑनलाइन सेवांवर जाऊन ‘क्लेम’ विभाग निवडावा

·      तुमचे बँक खाते प्रस्तापीत करा, ऑनलाइन दाव्यासाठी Next बटणावर क्लिक करा.

·      नवीन पेज ओपन झाल्यावर तुम्हाला PF Advance Form 31  हा पर्याय निवडा आणि तुमचे पीएफ खाते निवडा.

·      पैसे काढण्याचे कारण, रक्कम आणि पत्ता भरा.

·      त्यानंतर तुमच्या चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा.

·      तुमची संमती मागितली जाईल त्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत पडताळणी केली जाईल.

·      प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी संस्थेकडे जाईल. आणि काही दिवसांतच तुम्ही मागितलेली तुमच्या PF मधील रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. How to Claim PF Advance

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top