केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते. या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे हा सरकारचा योजना बनवण्यामागे उद्देश असतो. तसेच महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून काही वस्तू देण्यात जातात. या वस्तूंमुळे महिलांना जीवनत बराच फायदा होतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ही महिलांसाठी प्रचंड फायद्याचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस देण्यात आले आहे. त्याचबरोबर हे मोफत गॅस मिळालेला महिलांना प्रत्येक गॅस सिलेंडरच्या टाकीवर तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु आता तुम्हाला एक रुपया आहे खर्च न करता अन्न शिजवता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल ते कसे चला तर मग जाणून घेऊयात.
सध्या महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी केंद्र सरकार एक नवी योजना आणत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत अन्न शिजवता येणार आहे. म्हणजे आता अन्न शिजवण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. कारण केंद्र सरकारचा महिलांना मोफत सोलर गॅस स्टोव्ह देत आहे. सरकार सरकारच्या या योजनेमुळे एलपीजी साठी जाणारे पैसेही वाचणार आहेत तसेच तुमचे लाईट बिलही वाचणार आहे. त्याचबरोबर या गॅस स्टोव्ह महिलांचे देखील संरक्षण होईल. ज्याचं कारण म्हणजे स्वयंपाकापासून निघणाऱ्या दुधापासून महिलांचे संरक्षण होईल, त्याचबरोबर CO सारख्या गॅस पासून देखील महिलांचे संरक्षण होईल. त्याचबरोबर एलपीजी गॅस जळल्यामुळे त्यामधून NOx, SO2 बाहेर पडतात. ते महिलांसाठी चांगलेही नसतात.
काय आहे मोफत सोलर स्टोव्ह योजना?
केंद्र सरकार राबवत असलेल्या मोफत सौर चुल्हा या योजनेअंतर्गत महिलांना मोफत सोलर स्टोव्ह मिळणार आहेत. या स्टोव्हचे चार्जिंग महिला उन्हामध्ये करू शकतात. उन्हात चार्जिंग केल्यानंतर महिला यावर स्वयंपाक करू शकतात. यामुळे लाईट बिल वाढले किंवा एलपीजी गॅसचे दर वाढले तरी देखील याचा परिणाम तुमच्यावर काहीच होणार नाही. महिलांना हा सोलर स्टोव्ह इंडियन ऑइल कंपनीकडून देण्यात येत आहे.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार व्यक्ती भारतीय असणे आणि अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड,
रेशन कार्ड,
रहिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
कसा घ्यावा योजनेचा लाभ?
मोफत सौर चुल्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला बुकिंगचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारण्यात येईल आणि तुम्हाला मोफत सोलर स्टोव्ह मिळेल.