सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तरुण शिक्षण घेऊन देखील बेरोजगारीचा सामना करत आहेत. अनेकदा सुशिक्षित तरुणांना देखील कंपन्यांमध्ये भरतीच्या जागा सुटल्या तरी जाहिरातीची माहिती मिळत नाही. यामुळे अनेकदा तरुणांच्या हातून नोकऱ्या सुटतात. या सर्वांवरच तोडगा काढण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगारी नष्ट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याचमुळे राज्य सरकारने आता तरुणांसाठी एक नवे ॲप लॉंच केले आहे. या ॲप अंतर्गत तरुणांना नोकरी मिळणे सहज होणार आहे. चला तर मग हे ॲप कोणते आहे आणि तरुणांना या ॲपवरून कशी नोकरी मिळू शकते, याबद्दलची सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊयात.
तर मित्रांनो नागरिकांसाठी कायम प्रयत्नशील असणारे आपले राज्य सरकार तरुणांच्या बेरोजगारीकडे चांगले लक्ष देत आहे. अलीकडेच महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली. तर दुसरीकडे तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देखील करणाऱ्या प्रत्येक तरुणाला त्याच्या शिक्षणाानुसार सहा आठ आणि दहा हजार रुपये देण्यात येत आहे. अशातच आता तरुणांना नोकरी मिळण्यासाठी एक नवे ॲप लॉन्च केले आहे.
मुख्यमंत्री योजनादूत ॲप
राज्य सरकारने तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲपवरून राज्य सरकार तब्बल 55 हजार तरुणांना रोजगार देणार आहे. यासाठी तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना www. mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माहिती संपर्क कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत तरुणांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात येणार असून, त्यांना यासाठी दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी तरुणांना सरकारच्या लोककल्याणकारी योजना संदर्भात नागरिकांना माहिती द्यावी लागणार आहे.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 35 असणे अनिवार्य आहे. सदर अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे संगणकाचे ज्ञान आणि मोबाईल तसेच आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्जदाराकडे आधार कार्ड, पदवीधर असल्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, आधार संघ लग्न बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. तसेच अर्जदार व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी 13 सप्टेंबर 2024 पर्यंत आपली नोंदणी करू शकतात.