फक्त लाडकी बहिण योजनाच नाहीतर, महिलांना ‘या’ 4 योजनेंतर्गत मिळणार महिन्याला 1500 रुपये, लगेच करा अर्ज

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना तर महिन्याला 1500 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट देखील घालण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख हजारांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? लाडकी बहीण योजनेच्या पूर्वीच महिलांसाठी अशा योजना आहेत ज्या त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळवून देतात. चला तर मग या योजना कोणत्या आहेत याची माहिती जाणून घेऊयात. 

संजय गांधी निराधार योजना 

शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत विधवा, दिव्यांग, दुर्धर आजरग्रस्त अशा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. समाजामधील दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावा.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

त्याचबरोबर महिलांसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना देखील राबवली जाते. या योजनेअंतर्गत वृद्धांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील निराधार वृद्धांना लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत देखील महिलांना 1 हजार 500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.  

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

वृद्ध झालेल्या आजी आजोबांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत महिन्याला 1 हजार 500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ 65 वर्षांवरील नागरिकांना घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

तुम्हाला माहित आहे का इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 18 ते 79 वयोगटातील नागरिकांना महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. यासाठी अर्जदार 80% पेक्षा अधिक अपंगत्व किंवा बहुअपंग असणे आवश्यक आहे. अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करता येतो. त्यासाठी तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रात जावे लागेल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top