रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणतंही काम करायचं म्हटलं किंवा सरकारी प्रकरण करायचं म्हटलं तर सर्वप्रथम रेशन करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे रेशन कार्ड प्रचंड महत्त्वाचे ठरते. तसेच दुसरीकडे रेशन कार्ड वर सरकारच्या माध्यमातून स्वस्थ अन्नधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना रेशन कार्ड चे एकापेक्षा अनेक फायदे मिळतात. आता तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता रेशन कार्डधारकांना सरकारच्या सात योजनांचा लाभ घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात सरकारच्या या साथ योजना कोणत्या आहेत आणि या योजनांचा रेशन कार्डधारकांना काय फायदा होईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना एलपीजी गॅस मोफत देण्यात आले आहेत. तसेच त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर वर सबसिडी देखील देण्यात येते. परंतु या योजनेचा लाभ केवळ अशाच व्यक्ती करू शकतात ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. त्यामुळे तुमच्याकडे कडे जरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या. या योजनेच्या माध्यमातून तुम्हालाही मोफत गॅस आणि गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत नागरिकांना घरे दिली जातात. हे घरे केवळ अशाच नागरिकांना दिली जातात ज्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे केवळ असेच नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सरकारकडून अशा नागरिकांना घरे बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. तर दुसरीकडे शहरी भागातील नागरिकांना घरी बांधण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
प्रधानमंत्री पीक विमा योजना
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पंतप्रधान पिक विमा योजना देशात राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ मिळतो.
मोफत शिलाई मशीन योजना
त्याचबरोबर केंद्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजना देखील सुरू केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
केंद्र शासन देशातील शेतकऱ्यांसाठी देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
लेबर कार्ड योजना
तुम्हालाही जर लेबर कार्ड योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारकडून श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शंकाठधारकाला साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकार पेन्शन देते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.