शेती व्यवसायातून नफा कमवायचा म्हटलं तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. तरीही कधी शेतमालाला दर मिळतो तर कधी नाही. ही एक अतोनात कष्ट करून देखील शेतकऱ्यांसमोर जोखीमच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय म्हणजे जोडधंदा करणे गरजेचे असते. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय परवडायला लागतो. त्यामुळे तुम्हीही जर शेतकरी असाल आणि तुम्हालाही शेतीतून चांगल्या नफा मिळवायचा असेल ही बातमी तुमच्यासाठीच. आज आम्ही तुम्हाला शेतीसोबत एक असा जोडधंदा म्हणून करण्याचा सल्ला देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. चला तर मग हा व्यवसाय कोणता आहे, तसेच हा व्यवसाय करायला करण्यासाठी काय करावे लागेल, तसेच तुम्हाला अनुदान मिळेल का? याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू शकता. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून तुम्ही शेती सोबत मोठा नफा कमवू शकता. कुक्कटपालनासाठी राज्य सरकार मार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबवले जातात. राज्य सरकार शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तसेच कुकूटपालनाच्या व्यवसायाला गती देण्यासाठी या योजना राज्यात राबवत आहे. राज्य सरकार कुकूटपालनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. आता हे अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत मिळते याची माहिती पाहूयात.
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजना
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिल्ले, खाद्य, उपकरणे व इतर खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून कुकूटपालनाला योग्य दिशा तर मिळतेच परंतु ग्रामीण भागातील रोजगारांच्या संधी देखील वाढतात. हेच या योजनेमागील उद्देश आहे. त्याचबरोबर कुकूटपालनाच्या व्यवसायातून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा देखील ही योजना सुरू करण्याचा हेतू आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
लाभार्थ्याचे आधार कार्ड
मतदान कार्ड
लाभार्थ्याकडे असलेली मालमत्तेचा सातबारा किंवा आठ अ उतारा
बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट साईजचा फोटो
चालू मोबाईल क्रमांक
ई-मेल आयडी
कुक्कुटपालनासाठी सरकारकडून किती मिळते अनुदान?
राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य कुक्कटपालन विकास योजनेअंतर्गत कुक्कुटपालनासाठी 25% पर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर लोकांसाठी शासनाकडून हे अनुदान वाढीव स्वरूपात मिळते. म्हणजेच अशा लोकांना 35 टक्क्यांपर्यंत सरकार अनुदान देते. त्यामुळे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय निवडून लाखो रुपये कमावू शकता.