महागाई सवलतीचे दर आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दरवर्षी दोन वेळा बदलले जातात. शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा वाढवून मिळणारा महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात मिळतो तर दुसरा लाभ जुलै महिन्यापासून देण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी शासकीय प्रणालीकडून जाहीर होणाऱ्या या अतिरिक्त आर्थिक लाभाची प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला उत्सुकता असते. त्यामुळे यावर्षीचा महागाई भत्ता कधी वाढणार आहे याबद्दल अधिक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कारण यावेळी सणासुदीच्या दिवसांच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हे मोठ्ठ गिफ्ट दिलं आहे.
महागाई भत्त्याचे गणित
यावेळी 1 सप्टेंबर 2024 पासून सुधारित महागाई भत्त्याप्रमाणे केंद्रिय कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना 3% ने महागाई भत्ता वाढवून दिल्यास हा महागाई भत्ता 53% इतका होणार आहे. याचे एक उदाहरण असे पाहू की, एखाद्या कर्मचाऱ्याला 30000 पगार असेल तर 53% महागाई भत्ता वाढवून दिल्यास त्या कर्मचाऱ्याला 15900 रुपये वाढवून देण्यात येतील. असे या महागाई भत्त्याचे गणित आहे. म्हणूनच केंद्रिय आणि राज्य सरकारमध्ये काम करणारे शासकीय कर्मचारी या महागाई भत्ता वाढण्याची आतुरतेने वाट बघत असतात.
यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार माहिती आहे का?
सध्याच्या AICPI इंडेक्सनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून 3% वाढीव भत्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार एकूण महागाई भत्ता 53%टक्क्यांवर पोहोचला आहे. मगील वर्षी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक 400.90 होत ज्यानुसार गणना केल्यानंतर अंदाजे महागाई भत्ता 53.35% येते. भारत सरकार CPI-IW च्या मदतीने महागाई सवलतीचा दर आणि महागाई भत्ता यामध्ये सुधारणा करीत असते.
आतुरता पगारवाढीची
निवृत्ती वेतनधारक, केंद्रीय आणि राज्य कर्मचारीवर्ग या पगार वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लवकरच लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठी भेट देऊ शकते. अहवालांनुसार मोदी सरकार सणासुदीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक पैसे मिळतील.7th Pay Commission DA Update