Home Loan Closure: गृहकर्ज क्लोज करताना ही कागदपत्रं विसरू नका, नाहीतर अडचणीत याल!!!

Home Loan Closure Documents Checklist प्रत्येक व्यक्कीचे स्वप्न असते की त्याचे स्वतःचं घर असावे. परंतु सध्याच्या महागाईमध्ये एकरकमी पैसे भरुन घर विकत घेणे अशक्यच आहे. म्हणूनच बँकांचे महत्त्व वाढत आहे. बँका या अशा घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज देतात. ज्या बदल्यात अर्जदाराने दर महिना EMI च्या स्वरुपात बँकेला पैसे परत करायचे असतात. गृहकर्ज परतफेडीचा कालावधी हा गृहकर्जाची रक्कम किती आहे यावर ठरतो. तरीही हा कालावधी 10,20 ते 30 वर्षांचा असतो. जेव्हा गृहकर्ज पूर्ण होते तेव्हा बँकांकडून अर्जदाराने कर्ज घेताना सबमीट केलेली काही महत्वाची कागदपत्रे  परत घेणे गरजेचे असते. तसे न केल्यास अर्जदार अडचणीत येऊ शकतो. चला तर मग बघूया नेमकी कोणकोणती कागदपत्रे आहेत ती.

गृहकर्ज संपल्यानंतर ही कागदपत्रे  बँकांकडून घेणे आवश्यक

आपण पाहू शकतो की सध्या मार्केटमध्ये अनेक बँका आहेत ज्या गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नियमीत इनकम असेल तर सहज गृहकर्ज देण्यास तयार असतात. या बँका मात्र गृहकर्ज देताना त्याबदल्यात अर्जदराने खरेदी केलेल्या घराची, मालमत्तेची रजिस्ट्री स्वतःकडे ठेवतात. गृहकर्जाचा ठरावीक कालावधीनंतर पूर्ण झाल्यानंतर ही घराची रजीस्ट्री चे कागदपत्रं कर्ज घेतलेल्या व्यक्तीला परत केले जातात.  परंतु अनेकदा काही कर्जदार त्यांची महत्त्वाची कागदपत्रे बँकांकडून परत घेण्यास विसरतात किंवा त्यांच्याकडून ते राहून जाते.  परंतु तसे न करता गृहकर्ज पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून  ही अत्यंत महत्त्वाची असलेली कागदपत्रे परत मिळवणे आवश्यक असते. तसे न केल्यास गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीस विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी सर्वात पहिला दस्तऐवज म्हणजे NOC म्हणजेच No objection certificate – ना हरकत प्रमाणपत्र आणि दुसरे म्हणजे Encumbrance प्रमाणपत्र. चला तर मग या दोन कागदपत्रांचे महत्व जाणून घेऊ.

ना हरकत प्रमाणपत्र

गृहकर्जाते सर्व हप्ते फेडल्यानंतर  बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले जाते. हे प्रमाणपत्र म्हणजे कर्ज घेतलेल्या व्यक्तीने बँकेचे पूर्ण कर्ज फेडले आहे आणि आता बँकेकडे  कोणत्याही प्रकारची थकबाकी  शिल्लक नसल्याचे प्रमाणपत्र असते. ही NOC प्रत्येक गृहकर्ज पुर्ण केलेल्या व्यक्तीने बँकेकडून मिळवणे आवश्यक असते. या  ना हरकत प्रमाणपत्रावर बँकेचे गृहकर्ज बंद झाल्याची तारीख, रजिस्ट्रीनुसार अर्जदाराचे नाव, बँक खात्याचे तपशील, कर्जाशी संबंधित सर्व माहिती आणि अर्जदाराच्या मालमत्तेचे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून घ्यावे. बँकेकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर एखादी चुक झाल्यास ती दुरुस्त करुन घ्यावी. कारण अर्जदाराने घेतलेल्या गृहकर्जाचे पूर्ण पैसे बँकेला परत केल्याचा तो मुख्य पुरावा असतो.

Encumbrance Certificate

त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे Encumbrance Certificate. हे कागदपत्रं कर्ज बंद केल्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन मिळविणे आवश्यक असते. या कागदपत्रानुसार घर किंवा मालमत्तेवर अर्जदाराचे कोणतेही देय नाही, याचा पुरावा आहे. रजिस्टार कार्यालयातून Encumbrance Certificate मिळवणे. हे कागदपत्रं म्हणजे केवळ तुम्ही देय रक्कम पूर्ण भरली आहे याचा पुरावाच नाही, तर भविष्यात मालमत्ता विकताना कोणतीही अडचण येणार नाही याचीही खात्री करुन देणारा पुरावा आहे. .

गृहकर्ज हे घराचे स्वप्न पुर्ण करणारी एक प्रक्रिया असली तरी गृहकर्ज पुर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने जबादारीने आणि काळजीपूर्वक कागदपत्रांची जमवाजमव  करण्याची आवश्यकता असते. तसे न केल्यास भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top