शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठी प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण शेतीसोबत पशुपालन करणे फायद्याचे ठरते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. परंतु शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाकडून दिलेल्या आदेशानुसार तत्काळ योजनांसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. नुकताच आता पशुसंवर्धन विभागाकडून योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना 1 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हे अर्ज केवळ ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण आवश्यक आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजना
पशुसंवर्धन विभागाच्या या योजनांतर्गत शेतकऱ्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत गायी- म्हशींचे गट वाटप, शेळी -मेंढी गट वाटप तसेच संगोपनासाठी 1 हजार मांसल पक्षी, निवाऱ्यासाठी शेड बांधण्यासाठी अर्थसहाय्य त्यासह 100 कुक्कट पिलांचे वाटप आणि 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजना राबवण्यात येत आहे. तर या योजनांचा लाभ घेण्यासाठी 2025- 2026 या वर्षात ऑनलाईन निवड पद्धत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अर्ज कसा करावा?
पशुसंवर्धन विभागाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही https://ah.mahabms.com/ या वेबसाइटवर अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन ani शेळीपालन याचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज करताना आधार संलग्न मोबाईल नंबर वापरावा. कारण तुम्हाला याच मोबाईल नंबरवर तुमच्या अर्जाच्या स्थितीचे मेसेज येणार आहे. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.