पोस्ट ऑफिसच्या SCSS या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार ₹10,250 रुपये, जाणून घ्या सविस्तर

Senior Citizen Savings Scheme – आजच्या काळात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये रिअल इस्टेट गुंतवणूक, स्टॉक्स आणि बॉण्ड्स, एफडी या प्रकारच्या गुंतवणूक आहेत परंतु गेल्या काही वर्षांत लोकांचे पोस्टामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे कारण पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला मोठा परतावा मिळत आहे तर जाणून घेवूया पोस्टाच्या एका नवीन स्कीम बद्दल.

Senior Citizens Savings Scheme

प्रायव्हेट सेक्टर मध्ये जे लोक जॉब करत असतात त्यांना निवृत्ती नंतर पेन्शन मिळत नाही. त्यासाठी भारत सरकार ने एक महत्वपूर्ण योजना आखली आहे ती म्हणजे वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme – SCSS) 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

वरिष्ठ नागरिक बचत योजना | Senior Citizen Savings Scheme

वरिष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्रीय सरकार ची विशिष्ठ बचत योजना आहे. ही योजना सिनियर सिटिझन म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षावर आहे त्यासाठी आखली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे हे आहे. ही योजना त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत देते, जो त्यांच्या दैनंदिन खर्चांना भागवण्यास मदत होईल.

योजनेची वैशिष्ट्ये

पात्रता:- या योजनेचा लाभ ही 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले महिला किंवा पुरुष घेऊ शकतात. 55 ते 60 वर्षे वयोगटातील सरकारी कर्मचारी, जे नियमांनुसार सेवानिवृत्त झाले आहेत, तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

गुंतवणुकीची मर्यादा

या योजेअंतर्गत तुम्ही कमीत कमी 1हजार ते जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम तुमच्या बचतीसाठी योग्य ठरेल?

कालावधी

गुंतवणूकदारांने SCSS मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम ही 5 वर्षांसाठी जमा केली जाते. या कालावधीनंतर, गुंतवणूकदाराला त्याची मुद्दल रक्कम परत केली जाते. मात्र, इच्छुक असल्यास गुंतवणूकदार आणखी 3 वर्षांसाठी ही गुंतवणूक वाढवू शकतो.

व्याजदर

या योजनेत इतर योजनांच्या आणि एफडी च्या तुलनेत अधिक व्याजदर मिळतो. सध्या, या योजनेत 8.2% वार्षिक व्याजदर मिळतो. हा व्याजदर सरकारकडून दर तिमाहीला निश्चित केला जातो.

व्याजाचे वितरण

या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर तिमाहीला व्याज भेटते आणि हे मिळालेले व्याज डायरेक्ट गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते.

गुंतवणुकीचे स्पष्टीकरण

जर का एखादा वरिष्ठ नागरिक या योजनेत 15 लाख रुपये गुंतवतो. सध्याच्या 8.2% व्याजदराने, त्याला पुढीलप्रमाणे परतावा मिळेल:

एकूण गुंतवणूक: 15,00,000 रुपये

कालावधी: 5 वर्षे

वार्षिक व्याजदर: 8.2%

5 वर्षांनंतर एकूण रक्कम: 21,15,000 रुपये

एकूण व्याज: 6,15,000 रुपये

तिमाही व्याज: 30,750 रुपये

मासिक व्याज: 10,250 रुपये

यावर आपल्याला समजते की SCSS मध्ये गुंतवणूक करून एक वरिष्ठ नागरिक दरमहा 10,250 रुपयांचे नियमित उत्पन्न मिळवू शकतो, जे त्याच्या दैनंदिन खर्चांसाठी उपयुक्त ठरू शकते.

Leave a Comment