महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत २ फेब्रुवारी २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला होता, तो जमिनीच्या मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता यासंदर्भात मोठे पाऊल मानले जात असून हा शासन निर्णय विशेषतः भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीशी संबंधित होता. जमिनीची मोजणी झाल्यानंतर मिळणाऱ्या ‘क’ प्रतीच्या नकाशामध्ये आता अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) यांचा समावेश करून ती नकाशा प्रत लाभार्थ्याला दिली जाणार आहे. यामुळे जमिनीच्या हद्दीबाबतची अचूक माहिती मिळणे शक्य होणार असून वादविवाद आणि गैरसमज टाळले जाणार आहेत.

सदर शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 136 आणि महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व चिन्ह नियम 1969 च्या तरतुदीनुसार, जेव्हा जमीनधारक किंवा हितसंबंधित व्यक्ती विभागाकडे अर्ज करून जमिनीची मोजणी करून घेतात, तेव्हा त्या मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून ‘क’ प्रत पुरवण्यात येते.
ही प्रत म्हणजेच मोजणीचा नकाशा असून त्यात प्रत्यक्ष मोजणीवेळी दिसलेली वहीवाट, ताबा आणि अभिलेखातील हद्दी नमूद केल्या जातात. परंतु आतापर्यंत या प्रतांमध्ये अक्षांश आणि रेखांश यासारखी भौगोलिक सीमा (Coordinates) माहिती समाविष्ट नसायची. या चुकीमुळे वादविवाद निर्माण होत होते.
स्थिती बदलणार
मात्र, आता ही स्थिती बदलणार आहे. सद्यस्थितीत भूमी अभिलेख विभाग GPS आधारित GNSS Rovers, इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन्स (ETS), डिजिटल नकाशे आणि GIS प्रणालीचा वापर करत आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी करताना अधिक अचूक नकाशे तयार होऊ लागले आहेत.
लाडक्या बहिणींना मिळणार ₹1 लाख कर्ज – तेही शून्य टक्के व्याजदराने?
शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीच्या मोजणीच्या नकाशांवर अक्षांश-रेखांश नमूद करून ‘क’ प्रत दिली जाणार आहे. यामुळे मोजणी अधिक अचूक होईल आणि जमीन धारकांना डिजिटल स्वरूपातही ही माहिती मिळू शकेल.
या निर्णयाचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार असून मोजणीच्या वेळी होणाऱ्या मानवी चुकांमुळे जे हद्दीचे वाद उद्भवत असत, त्यावर आता कायमस्वरूपी तोडगा मिळणार आहे.
विशेषतः शेजारील जमिनीच्या धारकांमध्ये हद्दीबाबत निर्माण होणारे वाद, दोन वेळा मोजणी झाल्यामुळे तयार होणारी गोंधळाची स्थिती किंवा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अचूक पुरावे देताना येणाऱ्या अडचणी, या सर्व समस्या दूर होतील.
मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रतीमध्ये आता अक्षांश आणि रेखांश दिले गेले की, कोणती हद्द कुठे आहे हे स्पष्ट दिसणार आहे आणि त्यात मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होणार आहे.