बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ऑनलाईन पद्धतीने ‘भांडी वाटप संच’साठी अर्ज प्रक्रिया सुरु

राज्यामध्ये हजारो बांधकाम कामगार विविध प्रकल्पांमध्ये अहोरात्र मेहनत करत आहेत. या कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळ विविध योजना राबवत असते. सेफ्टी किट वाटप, उपयोगी वस्तुंचे किट वाटप, आरोग्य सुविधा व आर्थिक सहाय्य अशा योजनांबरोबरच अलीकडेच भांडी वाटप संच ही योजना देखील मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना घरगुती उपयोगासाठी आवश्यक असलेला भांडी संच (Utensils Kit) मोफत स्वरूपात देणे हा आहे. राज्यभरात विविध ठिकाणी हे संच वितरित करण्यात आले, मात्र काही कामगार वंचित राहिल्यामुळे आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

bandhkam kamgar utensil form

भांडी वाटप अर्जासाठी आवश्यक नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा?

जर तुम्ही आधीच बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असाल आणि तुमची नोंदणी ‘अप्रूव’ स्थितीत असेल, तर तुम्हाला भांडी वाटप संचासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी सर्वप्रथम https://iwbms.mahabocw.in/profile-login या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून “Proceed” या पर्यायावर क्लिक करावे. पुढील टप्प्यात, तुमच्या मोबाईलवर एक OTP (One Time Password) येईल, तो OTP टाकून पुढे जा. यानंतर तुमची नोंदणी संबंधित माहिती स्क्रीनवर उघडेल.

या ठिकाणी जर तुमची अर्जाची स्थिती “Application Approved” अशी असेल, तरच तुम्ही पुढील ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस पात्र ठरता. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपल्या नोंदणीची स्थिती तपासणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – भांडी वाटप संचासाठी

भांडी संच मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील पायऱ्या पूर्ण करा:

  1. वर्कर नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा.
  2. तुमची संपूर्ण माहिती दिसेल.
  3. त्यामध्ये शिबीर’ (Camp) हे ऑप्शन दिसेल – तिथे तुमच्या जवळचं शिबीर निवडा.
  4. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट (Appointment Date) निवडा.
  5. तुम्हाला त्या दिवशी संबंधित कार्यालयात जाऊन भांडी संच प्राप्त करावा लागेल.
  6. त्यानंतर Declaration Form डाउनलोड करून त्यावर तुमचं नाव, नोंदणी क्रमांक भरून सही करा व अपलोड करा.
  7. शेवटी ‘Print’ ऑप्शनवर क्लिक करून अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करा.
  8. हेच प्रिंटेड लेटर घेऊन तुम्ही दिलेल्या तारखेला संबंधित कार्यालयात उपस्थित राहा आणि भांडी वाटप संच घ्या.

बांधकाम कामगार योजना 2025: अर्ज प्रक्रिया, फायदे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या

राज्य शासनाच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत सुरु करण्यात आलेली ही योजना हे दाखवते की शासन कामगारवर्गासाठी संवेदनशील असून त्यांच्या गरजा ओळखून सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. भांडी वाटप संच ही योजना त्यातीलच एक पायरी आहे. त्यामुळे जर तुम्हीही पात्र असाल, तर आजच अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला अर्ज भरा.

1 thought on “बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ऑनलाईन पद्धतीने ‘भांडी वाटप संच’साठी अर्ज प्रक्रिया सुरु”

Leave a Comment