आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक असणाऱ्या गोष्टी म्हणजे रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर होय. तसेच सध्याच्या काळात सर्वकाही डिजिटल झाले आहे, त्यामुळे गैरप्रकारांना देखील आळा बनण्यास मदत झाली आहे. तर दुसरीकडे सतत नियमांमध्ये देखील बदल होत आहेत. त्याचबरोबर देशात प्रत्येक गोष्टीसाठी लिंकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांना आळा बसण्यास मदत होणार आहे. अशातच आता रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. चला तर मग हे नियम काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात.

आता गॅस सिलेंडर आणि रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलांचा थेट परिणाम हा सामान्य नागरिकांवर होणार आहे.
या नव्या नियमांमुळे गॅस आणि रेशनचा लाभ हा गरज असलेल्या योग्य लोकांचं मिळणार आहे. त्यामुळे आता गैर प्रकार करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा मिळणार नाही आणि हेच सरकारचे ध्येय देखील आहे.
याच कारणासाठी सरकार सतत नवनवीन उपाययोजना काढत आहे. आता हे नियम काय आहेत ते पाहुयात.
रेशन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य
सरकारने आता तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. म्हणजेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला रेशन कार्डसोबत आधार केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन दुकानात जावे लागणार आहे.
तेथे रेशन दुकानदार तुम्हाला तुमचे केवायसी करून देईल. आता सरकारच्या या नियमानुसार जे लोक चुकीच्या पद्धतीने रेशन धान्य घेत होते त्यांचे हे गैरप्रकार कायमचेच संपुष्टात येणार आहेत. तुम्हाला रेशन कार्डसोबत आधार कार्डची केवायसी करण्यासाठी प्रत्यक्ष व्यक्ती समोर लागेल. त्या व्यक्तीचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे ओळख अनिवार्य करण्यात आली आहे.
गॅस बुकिंग अनिवार्य
त्याचबरोबर आता सरकारने गॅस बुकिंग देखील अनिवार्य केली आहे. गॅस बुकिंग केल्याशिवाय नागरिकांना गॅस मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला गॅस बुक करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस मिळेल.
ज्यांचे गॅस बुकिंग होईल त्यांनाच सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनला तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.