आता सातबाऱ्यावर येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव; लगेच जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

चालू काळात देशात महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिलांना प्रत्येक ठिकाणी स्थान देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता कृषी क्षेत्रात देखील महिलांना स्थान देण्यासाठी सरकार राज्यात एक नाविन्यपूर्ण योजना राबवणार आहे. ज्याची सुरुवात देखील करण्यात आली आहे. आता सरकार थेट सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदवणार आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

satbara wife name

सातबाऱ्यावर येणार पत्नीचे नाव

कोल्हापूरमधील करवीर तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचं पाऊल उचलण्यात आले आहे. या तालुक्यात महिलांसाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ राबवण्यात येत आहे. आता ही योजना शेतीच्या सातबाऱ्या संबंधित आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

म्हणजेच आता सातबारा उताऱ्यामध्ये महिलांच्या नावाची देखील नोंद लागणार आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होणार आहे. तसेच महिलांना देखील संपत्तीमध्ये स्थान मिळणार आहे. तसेच करवीर तालुक्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी शेतजमिनीवर पत्नीच्या नावाची नोंद करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

लक्ष्मीमुक्ती योजनेसाठी विनामूल्य नोंदणी प्रक्रिया

लक्ष्मीमुक्ती योजनेचा लाभ महिलांना पतीच्या नावावर असलेल्या जमिनीवर मिळणार आहे. म्हणजेच शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर पतीसोबतच पत्नीचे देखील सहहिस्सेदार म्हणून नाव लागणार आहे.

या’ शेतकऱ्यांचे नाव काळया यादीत होणार समाविष्ट आणि पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ

या योजनेंतर्गत पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर अगदी विनामूल्य नोंदवण्यात येणार आहे. म्हणजेच या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकाराची नोंदणी फी किंवा मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार नाहीत. सध्या ही योजना केवळ करवीर तालुक्यात राबवण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे

महिलांना या योजनेत लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ती खालीलप्रमाणे:-
“पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज.
• गटाचा सातबारा उतारा व 8-अ उतारा.
• आधारकार्ड झेरॉक्स.
• रेशनकार्ड झेरॉक्स.
• विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
• पोलिस पाटील यांच्याकडील कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला

Leave a Comment