जमीनीचा मालकी हक्कामध्ये कधी आणि कसा बदल होतो? मालकी बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचा

कुठलीही मालमत्ता म्हटलं की, त्याची मालकी हक्क कोणाकडे आहे हे पहिल्यांदा विचारले जाते. कारण मालमत्ता कोणी माझी म्हणण्याने आपली होत नसते. कारण या जगात फक्त कागदच बोलतो. त्यामुळे मालमत्तेसाठी मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज यांच्यामध्ये बदल घडतात. नवीन नियमांमुळे अनेकदा लोकांना आपला मालकी हक्क सोडावा देखील लागतो. त्यामुळे अनेकदा वाद होण्याची शक्यता वाढते. पण जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कधी बदल होतो? आणि बदल करण्याचे नियम काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कायदेशीर कारणामुळे बदल करण्यात येतो. त्यामुळे जमिनीचे मालकी हक्क मूळ मालकाकडून नकळत देखील काढून घेतले जातात. त्यामुळे अनेकवेळा मोठ्या वादाची परिस्थिती निर्माण होते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कित्येकवेळा गावातील व्यक्ती शहरात गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावची जमिनीचे मालकी हक्क काढून इतरांच्या नावे जमिनीची नोंद करण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण हा प्रकार कसा घडतो हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.

जमीनीचा मालकी हक्कामध्ये कधी आणि कसा बदल होतो?

भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मालकीत बदल करण्यात येतो. म्हणजेच अनेकदा सरकार सार्वजनिक प्रकल्प आणते. अशावेळी खाजगी जमीन मालकाचे नाव हटवून सरकार भूसंपादन व पुनर्वसन कायद्याअंतर्गत सरकारच्या संपादन यंत्रणेचे नाव नोंदवले. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना त्याची किंमत दिली जाते.

जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून मालकीत बदल करण्यात येतो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या जमिनीची खरेदी विक्री होते त्यावेळी खरेदीखत तयार केले जाते. त्याचवेळी तलाठी फेरफार घेऊन नव्या सातबारा उताऱ्यात नव्या मालकाचे नाव अधिकृतपणे नोंदवतो.

तसेच एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन असेल आणि ती व्यक्ती मरण पावली. तर त्या व्यक्तीच्या नावाची जमीन त्याच्या वारसांच्या नावावर केली जाते. यासाठी व्यक्ती मरण पावल्यानंतर 90 दिवसांच्या आत तलाठ्याकडे अर्ज करून वारस नोंद लावावी लागते. 

Leave a Comment