तरुणांसाठी खुशखबर! आता व्यवसायासाठी मिळवा 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; पहा काय आहे योजना? 

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील तरुण सुशिक्षित असून देखील त्यांना नोकऱ्या मिळण्या कठीण झाला आहे. यामुळेच तरुणांना स्वावलंबी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. किमान रोजगार नाही तर स्वतःचा कोणताही व्यवसाय करून तरुण बेरोजगारीचा सामना करू शकतात. याचमुळे सरकारने या योजना अमलात आणल्या आहेत. आता राज्य सरकारने तरुणांसाठी एक नवी योजना आणली आहे. चला तर मग ही योजना कोणती आहे आणि तरुणांना व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत किती आर्थिक पाठबळ दिले जाते हे जाणून घेऊयात.

काय आहे योजना? 

राज्य सरकारने देशातील बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी तब्बल 10 ते 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. इतकच नाही तर दिलेल्या या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले जात नाहीत. त्यामुळे तरुणांना हे कर्ज परवडण्यासारखे आहे. या कर्जाच्या रकमेवर जे काही व्याजदर आकारले जातात ते सरकारकडून भरले जाते. 

योजनेचा मुख्य उद्देश 

अनेकदा तरुणांची व्यवसाय करण्याची इच्छा असूनही त्यांना व्यवसायासाठी आर्थिक भांडवल नसते, त्यामुळे तरुणांना पुढे पाऊल टाकता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने 2024 मध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांना 10 ते 50 लाखांपर्यंत कर्ज देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा हा या योजनेमागे मुख्य उद्देश आहे.  

योजनेचा कोणाला मिळेल लाभ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी शर्तींच पूर्तता करावी लागणार आहे. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.  

तसेच अर्जदार तरुण बेरोजगार असावा. 

अर्ज करणाऱ्या तरुणाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे. 

या योजनेअंतर्गत कर्ज केवळ सुशिक्षित तरुणांना देण्यात येईल. 

अर्जदार तरुण 18 ते 55 वयोगटातील असणे अनिवार्य आहे. 

आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड 

रेशन कार्ड

कायमच्या पत्त्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स ) 

जात प्रमाणपत्र 

आयकर प्रमाणपत्र 

व्यवसाय प्रमाणपत्र 

बँक खात्याचे पासबुक 

पासपोर्ट साईज फोटो 

मोबाईल नंबर 

ईमेल आयडी 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा? 

या योजनेच्या लाभासाठी सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणीचा पर्याय दिसेल.

नोंदणीच्या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल. 

सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

त्यानंतर भरलेला व्यवस्थित आहे याची पडताळणी करून सबमिट करावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.  

1 thought on “तरुणांसाठी खुशखबर! आता व्यवसायासाठी मिळवा 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; पहा काय आहे योजना? ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top