शेती करणे काही सोपी गोष्ट नाही असे म्हटले जाते. कारण ते खरेच आहे. कारण शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग त्या आर्थिक अडचणी असतात, तर कधी नैसर्गिक आपत्ती ही पिकासाठी घातक ठरते. नैसर्गिक आपत्ती पिकावर उडवल्यामुळे पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा येण्याआधीच पाण्यात जातो. म्हणूनच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नैसर्गिक आपत्ती भरपाईसाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. आता ई पीक पाहणी साठी मुदत वाढ करण्यात आली आहे.
ई पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदत वाढ
ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई पीक पाहणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ई पीक पाहणी करण्यासाठी संधी चालून आली आहे. कारण आता शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता ई पीक पाहणीमध्ये आठ दिवसांची मुदत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकरी आता 23 सप्टेंबरपर्यंत आपली एक आपल्या पिकाची ई पीक पाहणी करू शकतात. इतकच नाही तर शेतकरी आता इंटरनेटशिवाय आपल्या पिकाची ई पिक पाहणी करू शकणार आहेत.
तलाठी स्तरावरही पीक पाहणीसाठी मुदत वाढ
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तलाठी स्तरावरवरील पिक पाहण्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली नुकसानीची आता तलाठी ई पीक पाहणीची तपासणी करू शकणार आहेत. घरच्या या निर्णयामुळे तलाठी स्तरावरील तलाठी व सहाय्यक अधिकारी 24 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत पिक पाहणी करू शकणार आहेत.
इंटरनेटशिवाय होणार ई पीक पाहणी
शेतकऱ्यांची ई पिक पाहणी जलद गतीने व्हावे साठी राज्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण राबवण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून शेतकरी गट हद्दीतून आपल्या पिकाची पाहणी करू शकत आहेत. शेतकऱ्याला त्याच्या गट हद्दीत जावे लागत असल्यामुळे सरकारला या डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाच्या माध्यमातून पिकाची अचूक माहिती मिळते. यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या अजूनही पाहणे झाले नाही त्या शेतकऱ्यांनी आता पाहणी करून घ्यावी. तसेच काही अडचण निर्माण झाल्यास “(०२०) २५७१२७१२” या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच इंटरनेटशिवाय ही ई पीक पाहणी होणार आहे.