केंद्र सरकारकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य संदर्भात मोठा खर्च आल्यास तो खर्च करणे शक्य होत नाही. अशावेळी नागरिकांना उपचाराअभावी आपला जीव गमावावा लागतो. त्यामुळे नागरिकांना या आर्थिक स्थितीतून आणि आजारपणातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे. ती म्हणजे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होय. आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य विमा देण्यात येतो.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी पहिली आरोग्य विमा योजना अशी या योजनेची ओळख आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये देखील नागरिकांना मोफत उपचार देण्यात येतो. या योजनेचा लाभ कुटुंबातील सर्व व्यक्ती घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा देण्यात येतो. त्यामुळे नागरिकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे.
कसा मिळेल लाभ?
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड बनवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आयुष्मान भारत कार्ड बनवणे गरजेचे आहे. आयुष्मान भारत कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्यात येतो. आयुष्मान भारत आरोग्य विमा ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील नागरिक तसेच इतर राज्यातील नागरिक देखील घेऊ शकता.
योजनेची व्याप्ती वाढवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच वेळोवेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेत असतात. या बैठकीमध्ये देशातील काही अडीअडचणींचा तोडगा तसेच जनतेसाठी नवनवीन योजना अशा प्रकारचे निर्णय घेत असतात. अशातच केंद्र सरकारने नागरिकांच्या हिताचा विचार करत आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता वयाची 70 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु त्यांना देखील आयुष्यमान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे.