Pm Awas Yojana List 2024 | केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘पंतप्रधान आवास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना दरवर्षी मोफत घरे दिली जातात. जर तुम्हीही 2024 मध्ये पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. ज्याचं कारण म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. चला तर मग या यादीमध्ये तुमचे नाव कसे शोधायचे याची प्रक्रिया जाणून घेऊयात.
पंतप्रधान आवास योजना
पंतप्रधान आवास योजनेसाठी अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. परंतु या योजनेच्या लाभ अशाच नागरिकांना मिळणार आहे जे नागरिक या योजनेसाठी खरंच पात्र असतील. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात येतो. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दरवर्षी देशातील जवळपास 20 हजार नागरिकांना 1 लाख रुपयांची घरे मोफत देण्यात येतात.
तसेच तुम्हालाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. पंतप्रधान आवास योजनेच्या pmaymis.gov.in वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झाला तर तुमचेही नाव या यादीमध्ये लवकरच जाहीर होऊ शकते.
पंतप्रधान आवास योजना शहरी आणि ग्रामीण
पंतप्रधान आवास योजना ग्रामीणअंतर्गत खेड्यामध्ये राहणाऱ्या गरीब आणि असहाय्य नागरिकांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांना घर बांधण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपये देण्यात येतात. जाहीर झालेल्या या यादीमध्ये अशा नागरिकांशी नावे समाविष्ट आहेत, ज्यांच्या कुटुंबामध्ये 25 वर्षांहून अधिक वयाची व्यक्ती नाही.
ते झोपडीत जीवन जगत आहे. तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नोकरी करत नाही. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत केवळ अशाच नागरिकांना याचा लाभ देण्यात येतो जे नागरिक गरीब असतील.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी?
तुम्हाला जर पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी पाहिजे असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गृहनिर्माण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला awaassoft हा पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
FMS Reports या पर्यायातील Beneficiaries registered, accounts frozen and verified यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला इलेक्शन फिल्टर यामध्ये वर्ष निवडावे लागेल.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्रामीण किंवा शहरी हा पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर तुमचा जिल्हा, गाव अशी माहिती प्रविष्ट करावी लागेल. यानंतर कॅप्चा फील करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
या प्रक्रियेनंतर तुमच्यासमोर गृहनिर्माण योजनेची एक PDF ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.