शेती करायचा म्हटलं की शेतीमध्ये शेतकऱ्याला राबराब राबवावे लागते. तेव्हा कुठे शेतकऱ्याचे पीक जोमात येते. शेतकऱ्यांना शेती करताना विविध अवजारांची गरज भासत असते. यात अवजारातून शेतकरी शेती (Agriculture ) पिकांसाठी शेतात मेहनत घेतात. त्याचबरोबर सध्या रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) देखील शेतकरी वापर करतात. कीड अळीसाठी शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी पंपाची गरज असते. आता यात संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी पंप अनुदानावर दिला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांना बॅटरी पंपासाठी किती अनुदान मिळेल.
शेतकऱ्यांना शेती पिकांवर फवारणी करण्यासाठी बॅटरी पंपासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना बॅटरी पंपासाठी 100% अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बॅटरी पंप आणि स्प्रे पंप यासाठी 100% अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना आता शंभर टक्के अनुदानावर बॅटरी पंप मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील कामे लवकर होणार आहेत. या पंपाच्या माध्यमातून शेतकरी जलद गतीने पिकावर फवारणी करू शकतात.
बॅटरी पंपावर अनुदानासाठी कसा करावा अर्ज?
जर शेतकऱ्यांना फवारणीसाठी बॅटरी पंपासाठी 100% अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. शेतकऱ्यांना बॅटरी पंप शंभर टक्के अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्य शासनाच्या महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर जावे लागेल. तेथे बॅटरी पंपासाठी अनुदान योजना सर्च करावी लागेल. यानंतर तुम्ही बॅटरी पंप किंवा स्प्रे पंप हा पर्याय निवडू शकता. यानंतर तुम्ही विचारलेली सर्व माहिती सविस्तर भरून फवारणी पंपासाठी अर्ज करू शकता.
बॅटरी पंपासाठी कसे मिळणार अनुदान?
शेतकऱ्यांनी बॅटरी पंपासाठी केलेले अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक डिटेल्स व्यवस्थित देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बॅटरी पंपासाठी 100% अनुदानासाठी सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांना या अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही.
Sandippange172@gmail.com nimgaon dude shirur pune
Sandippange172@gmail.com nimgaon dude takli haji shirur pune