केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन योजना राबवल्या जातात. ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील सरकारच्या या योजनांना चांगला प्रतिसाद दिला जातो. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. चला तर मग या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कृषी यांत्रिकीकरणासाठी 200 कोटींची तरतूद
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. कारण केंद्र सरकारने आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात चालवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी जवळापास केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के वाटा असणार आहे तर, राज्य सरकारचा 40 टक्के असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही सरकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठे अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान
केंद्र सरकार देशात शेतीच्या यांत्रिकरणाला चालना देण्यासाठी या योजनेला पाठिंबा देत आहेत. तसेच या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमातीच्या व सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना सरकारकडून टॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ‘महाडीबीटी’अंतर्गत पात्र होतील अशाच लाभार्थ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी कसे मिळणार अनुदान?
केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना तसेच महिला शेतकऱ्यांना, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची जी किंमत असेल त्याच्या 50% रक्कम किंवा 1.25 लाख रुपये (जी रक्कम कमी असेल ती) यानुसार अनुदान मिळणार आहे. तसेच सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या 40% रक्कम किंवा १ लाख (जी रक्कम कमी असेल ती) रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान वितरण कसे होणार ?
सर्वसाधारण शेतकरी: ₹१६४.२३ कोटी
अनुसूचित जाती: ₹२२.२७ कोटी
अनुसूचित जमाती: ₹१७.६३ कोटी