60 वर्षांच्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळणार, पीएम किसान मानधन योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारची गोल्डन ऑफर

भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता मिळवू देणारी पीएम किसान मानधन योजना ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे  जी गोल्डन ऑफरसारखी आहे.  ही योजना दिनांक 12 सप्टेंबर 2011 मध्ये भारत सरकारमार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा 3000/- रुपये पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. परंतु त्याआधी त्यांना वयानुसार एक छोटी रक्कम दर महा बचत करण्याची देखील गरज आहे. परंतु अगदी छोट्या रकमेतून लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा वृद्धापकाळ आर्थिक सुरक्षित करण्याची संधी भारत सरकार या योजनेच्या माध्यमातून देत आहे.

PM Kisan Mandhan Yojana Installment
PM Kisan Mandhan Yojana Installment

योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट

ज्या शेतकऱ्यांची कमी शेत जमीन आहे म्हणजेच जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.  वृद्ध पानातील जीवन सुरक्षित व सुखकर व्हावे यासाठी शेतकऱ्यांना मानधनाच्या स्वरूपात शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

परंतु त्यासाठी दरमहा एक छोटी रक्कम शेतकऱ्यांनी जमा करणे अपेक्षीत आहे. शेतकरी मानधन योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति महिना रु 3000/- म्हणजेच वर्ष्याला 36000/- या पद्धतीने पैसे दिले जातात. तसेच लाभार्थी शेतकऱ्याची काही जीवितहानी झाली म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस दरमहा 1500/- रु दिले जातात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

·       अर्जदार शेतकरी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

·       अर्जदार शेतकरी अल्पभूधारक असल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

·       अर्जदार शेतकऱ्यांची जमीन  केवळ 1 ते 2 एकर असेल तरच या योजनेचा त्यांना लाभ घेता येणार आहे.  

दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल

केंद्र सरकारद्वारे  सुरु करण्यात आलेली पंतप्रधान शेतकरी मानधन योतनेच्या मदतीने प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळावा यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दर महिन्याला एक छोट्या रकमेची गुंतवणूक करावी लागणार आहे.

जर का शेतकरी बांधवाने 30 व्या वर्षी योजनेत खाते सुरु केल्यास दरमहा 110 रुपये भरावे लागणार आहेत तसेच त्यांच्या मुलांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून योजनेत खाते उघडले तर त्यांना दरमहा एकूण 55 रुपये गुंतवावे लागतील. शेतकरी बांधव 40 वर्षांनंतर सामील झाल्यास दरमहा 220 रुपये गुंतवावे लागतील.

अशा पद्धतीने वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यासोबतच अर्जदार शेतकऱ्याचे  नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेल्यानंतर या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळू शकणार आहे.  PM Kisan Mandhan Yojana Update

वयाच्या 60 वर्षांनतर इतकी रक्कम मिळेल

या योजनेत लाभार्थी ठरुन योग्य ती रक्कम दर महिना भरल्यानंतर खातेदार शेतकरी 60 वर्षांचा झाल्यास त्यांच्या खात्यात दर महिना 3000/- येणार आहे. अशा पद्धतीने दरमहिना 3000 म्हणजे वर्षाचे 36000/- लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड, आधारसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, मतदान ओळखपत्र, वयाचा दाखला ही सर्व कागदपत्रे घेऊन सेतू कार्यालयास भेट द्यावी. आणि तुमच्या नावाचा ऑनलाईन अर्ज करावा.

केंद्र शासनांतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांची माहिती करुन घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये सामिल व्हा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top