आता रेशन कार्डही झाले डिजिटल! कसे डाउनलोड करावे? अन् ‘ही’ कामे होणार घरबसल्या

आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेले दस्तावेज म्हणजे रेशन कार्ड. तुम्हाला तर माहितच आहे की, रेशन कार्डवर आपल्याला स्वस्त अन्न धान्य मिळते. त्याचबरोबर आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील त्याचा वापर होतो. तसेच अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्डाची मागणी करण्यात येते. आता याच रेशन कार्ड संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

digital ration card
Digital Ration Card

आता रेशन कार्डही झाले डिजिटल

सध्या जग हे डिजिटल झाले आहे, त्यामुळे कागदपत्रे देखील डिजिटल स्वरूपात तयार होत आहेत. आता तुम्हाला रेशन कार्ड देखील हातात घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता रेशन कार्ड देखील डिजिटल झाले आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

त्यामुळे तुम्ही सहज तुमच्या मोबाईल मधून तुमचे रेशन कार्ड दाखवू शकता आहे. म्हणजेच आताच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल रेशन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये ठेऊ शकणार आहे. आता हे डिजिटल रेशन तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे ते पाहुयात.  

डिजिटल रेशन कार्ड कसे काढावे?

डिजिटल रेशन कार्ड साठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ‘माय रेशन 2.0. हे ऍप डाउनलोड करावे लागेल. या ऍप वर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच त्यावर तुमच्या रेशन कार्डचा क्रमांक टाकावा लागणार आहे.

अशाप्रकारे तुमच्या मोबाईलवर या ऍप द्वारे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच तुम्ही कोठेही मोबाईल मधील डिजिटल रेशन कार्ड दाखवून तुमचे धान्य घेऊ शकता.

काय आहे फायदे?

सरकारने या ऍपच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डची माहिती सरकारला समजणार आहे. तसेच तुम्हाला जर रेशन कार्ड वरील पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही सहजपणे या ऍप वरून बदलू शकणार आहे. तसेच रेशन कार्डला लिंक असलेला नंबर देखील अपडेट करू शकता. तसेच रेशन कार्डमध्ये नव्या सदस्याचा देखील समावेश करू शकता. त्यामुळे तुम्हाला कोठेही फेऱ्या घालण्याची आवश्यकता नसेल. 

Leave a Comment