Mechanized Harvesting in Sugarcane | शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा सरकारच मुख्य हेतू आहे. इतकचं नाहीतर, सरकार वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी यंत्रणेसाठी देखील अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंत्रणेसाठी अनुदान दिल्याने शेतकऱ्यांची शेती आणखी सुधारेल व शेतीतून अधिकचे उत्पादन मिळेल. तसेच शेतकऱ्यांना लागणारा मजुरीचा खर्च देखील आटोक्यात येईल. आता ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान
शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येत आहे. या ऊस तोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना अमजुरांची कमतरता भासणार नाही. तसेच शेतीतील ऊस तोडणी देखील जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
आता याच ऊस तोडणी यंत्रासाठी (Mechanized Harvesting in Sugarcane) पंतप्रधान कृषी विकास योजनेंतर्गत अनुदान प्रकल्पासाठी तब्बल 232.43 कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाला सन 2025-2026 या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कसा मिळणार अनुदानाचा लाभ?
शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी MAHA-DBT धोरण स्वीकारले आहे. म्हणजेच कृषी विभागांना या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 21/04/2025 च्या पत्रानुसार “First Come, First Serve (FCFS)” अशाप्रकारे निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा मुळ कालावधी हा 2022- 2023 या वर्षांसाठी होता. मात्र, गरजेनुसार हा कार्यक्रम आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ
तसं पाहायला गेल तर, केवळ दोन वर्षे चालणाऱ्या या योजनेला आता चार वर्षे चालवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 232.43 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता आधीच आणखी दोन वर्षे वाढीव कालावधी ठरलेल्या प्रकल्पास आणखी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.