ग्रीडच्या माध्यमातून वीजनिर्मिती करुन शासन तसेच काही खाजगी कंपन्या देखील शहरी आणि ग्रामिण भागात वीज पुरवठा करतात. औद्योगिक शहरांना जास्त वीजेची गरज असते त्यामुळे अनेकदा ग्रामिण भागातील वीज बंद करुन ती शहरी भागात दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अंधारात रहावे लागते. परंतु सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीचा शोध जेव्हापासून लागला आहे तेव्हापासून भारत सरकार नागरिकांना सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करीत आहे.
दरवर्षी भारत सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. अशीच एक योजना नागरिकांसाठी शासनाने राबवली आहे. भारत सरकारने नेहमीच सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सौर रूप टॉप सबसिडी योजना सुरु करीत आहे. या योजनेचा लाभ घेऊन सोलार पॅनल बसविल्यास पुढील 25 वर्षे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वीजेची उपकरणे वापरता येतात. Solar Rooftop Subsidy Yojana 2024
सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान मिळवा
पंतप्रधान सौर ऊर्जा घर योजनेअंतर्गत 1किलो वॅट, 2किलो वॅट आणि 3 किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी विविध प्रकारची अनुदान सुविधा उपलब्ध आहे. 3 किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना 40% अनुदान देत होते परंतु कित्येक नागरिकांकडे आर्थिक अडचणी अभावी सौर पॅनल बसवता येत नसल्याने आता शासनाने हे अनुदा 60% इतके केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी https://pmsuryaghar.org.in या लिंकवर क्लिक करा, या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही योजनेसाठी अर्ज करु शकता. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. एनटीपीसी, पीएफसी, एनएचपीसी, नीपको, पावर ग्रिड, एसजीवीएन, टीएचडीसी आणि ग्रिड इंडिया या पीएसयू या योजनेवर देखरेख ठेवतील.
घराच्या छतावर बसवा सौर पॅनल
घराच्या छतावर 2kw सोलर रुफटॉप बसविल्यास त्यासाठी 47000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार या खर्चावर तुम्हाला 18000 रुपयांची सबसिडी देत आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्याकडे, किंवा अर्जदाराकडे नसल्यास त्यासाठी बँका लोन सुद्धा उपलब्ध करुन देत आहे.
4kw चे सोलर रुफटॉप बसविल्यास त्यासाठी 200 चौरसफूट जमीन लागते. रुफटॉप सोलर प्लँट लावल्यावर 86000 रुपये खर्च येतो. यामध्ये केंद्र सरकार 36000 रुपये अनुदान देत आहे. आणि लाभार्थ्याला 50000 रुपये खिशातून द्यावे लागतात. Solar Rooftop Subsidy Yojana 2024
दररोज 4.32 किलोवॅट वीज तयार करा
ऊर्जा मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार 130 चौरस फूट जागेवर सोलर रुफटॉप प्लँट बसवल्यास दररोज 4.32 किलोवॅट वीज तयार केली जाऊ शकते. या सौर ऊर्जेतून तयार होणाऱ्या विजेचा वार्षिक हिशेब लावल्यास जवळपास 1576.8 किलोवॅट प्रत्येक वर्षी वीज उत्पादन करता येऊ शकेल. त्यामुळे प्रति दिवशी तब्बल 13 रुपयांची बचत होईल आणि वार्षिक 5000 रुपयांची बचत करता येते. Solar Rooftop Subsidy Yojana 2024
Sirvapada talking navapur dist Nadurbar
At sirvapada talking navapur dist Nadurbar 425416