5 वर्षे ₹3,000/महिना गुंतवून मिळवा ₹2,14,097 ; पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम तुमच्या बचतीसाठी योग्य ठरेल

Post Office New Scheme अशा परिस्थितीत, भारतीय पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे. पोस्ट ऑफिस ही भारताची शासकीय संस्था आहे चला तर मग पण पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग अकाउंटमधील बचतीवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल अधिक माहिती मिळवूया.

दरमहा ₹3,000 ची गुंतवणूक करा

पोस्ट ऑफिसच्या या  रिकरिंग डिपॉझिट म्हणजे RD योजनेमध्ये दरमहा 3000 ची बचत केल्यास ही बचत 5 वर्षांसाठी सुरु ठेवा. असे केल्यास तुमची बचत 1,80,000/- रुपये जमा होतील. यावर तुम्हाला 6.7 टक्के व्याजाने 34,097 रुपये जमा होतील आणि 5 वर्षांनंतर  एकत्रित रक्कम 2,14,097 रुपये तुम्हाला मिळतील.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

दरमहा ₹5,000 ची गुंतवणूक करा

अधिक चांगला परतावा मिळवायचा असल्यास दरमहा 5000 रुपयांची बचत सुरु करा. ही बचत पोस्ट ऑफिसच्या या  रिकरिंग डिपॉझिट म्हणजे RD मध्ये केल्यास  एकूण जमा रक्कम 3,00,000/- रुपये इतकी होते त्यावर 6.7% व्याजदराने मिळणारे एकूण व्याज 56,830/- रुपये इतके मिळेल. 5 वर्षांनंतर  खातेधारकाला एकत्रित मॅच्युरिटी रक्कम 3,56,830/- रुपये इतकी मिळते.

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये बचत करण्याचे फायदे

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सर्वोत्तम व्याजदर मिळतो. येथील आर्थिक बचत अत्यंत सुरक्षित असते. चला तर मग पोस्ट ऑफिसच्या या योजनेत बचतीचे फायदे जाणून घेऊ.

·      पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये बचत केल्यास 6.7% वार्षिक व्याजदर मिळतो.  जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत हा खूपच आकर्षक व्याजदर आहे.

·      पोस्ट ऑफिसच्या या योजनांमुळे गुंतवणूकदारांना दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे खातेधारकांना नियमित बचतीची सवय लागते.

·      पोस्ट ऑफिसची सेवा घेणारे खातेदार त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार दरमहिना कमीत कमी ₹100 पासून ते जास्तीत जास्त ₹10,000 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे त्यांचा बचतीची सवय लागते.

·      आरडी खाते मुख्यतः 5 वर्षांसाठी उघडले जाते, परंतु गरज असल्यास 5 वर्षांनंतर आणखी 5 वर्षांपर्यंत बचतीचा कालावधी खातेधारकाला वाढवता येते. पोस्ट ऑफिस त्या वाढलेल्या कालावधीवर उत्तम व्याज देखील देते.

·      ही योजना भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता सुनिश्चित केली गेली आहे. गुंतवणूकदार निश्चिंतपणे या योजनेत बचत करु शकतात.

3 thoughts on “5 वर्षे ₹3,000/महिना गुंतवून मिळवा ₹2,14,097 ; पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम तुमच्या बचतीसाठी योग्य ठरेल”

Leave a Comment