तुम्हालाही वर्षाला तीन गॅस मोफत हवेत का? तर लगेच करा ई-केवायसी; पाहा अन्नपूर्णा योजनेचे नियम…

राज्य सरकार नेहमीच जनतेचा विचार करत असतं. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून राज्य शासन जनतेला आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असतं. नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महिलांना या योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे महिलांसाठी आणखी एका योजनेची घोषणा राज्य शासनाने केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोफत गॅस दिले जाणार आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांसाठी आणि महिलांसाठी राज्यात ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार म्हटल्यावर त्याचा महिलांना मोठा आधार होणार आहे. गॅस बचतीसाठी महिला आजही चुलीवर स्वयंपाक करतात. त्यांना होणारा हा त्रास टळणार आहे. तुम्हालाही मोफत गॅस हवा असेल तर तुम्हाला शासनाने दिलेल्या नियम पूर्ण करावे लागतील. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

गॅसची ई-केवायसी करणे बंधनकारक 

तुम्हालाही मोफत गॅस हवा असल्यास तुम्हाला गॅसची ई -केवायसी करणे आवश्यक आहे. या योजनेचा गैरवापर कोणी करू नये यासाठी शासनाने केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या गॅस एजन्सी चालवणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन लवकरात लवकर गॅसची ई -केवायसी करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तुमचे बँक खाते तुमच्या गॅसला लिंक करावे लागेल. यालाच ई केवायसी असे म्हणतात. ही माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत जनतेला देण्यात आली आहे. 

किती आणि कोणाला मिळणारं अनुदान? 

पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील लोकांना गॅस देण्यात आले होते. जे पंतप्रधान उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत अशाच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्डावरील एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. उज्वला योजनेअंतर्गत एका गॅस मागे 300 रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळते. याचप्रमाणे 830 रुपये गॅस सिलेंडरचा दर निषेध करून त्यातील 300 रुपये वजा करून 530 गॅस सिलेंडरसाठी अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. हे अनुदान तीन गॅस साठी देण्यात येणार आहे. 

Leave a Comment