महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील पशुपालकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत पशुपालकांना पाळीव प्राण्याचे संगोपन योग्य पद्धतीने करण्यासाठी अनुदान आणि पशुवैद्यकीय सेवा जाहीर करण्यात येतात. अहमदनगर जिल्हा परिषद पशूसंधर्वन विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्या अनुदानामध्ये दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी जिल्ह्यातील 208 शेतकर्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली आहे. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वाधिक असलेले 22 शेतकरी संगमनेर तालुक्यातील असून नेवासा तालुक्यातील 19 शेतकरी आहेत.

राज्यात पशुसंवर्धन पंधरवडा साजरा
दिनांक 1 ते 25 ऑगस्टच्या दरम्याने राज्यात पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात पशुसंवर्धन विभागाकडून पशुवैद्यकीय सेवा आणि पशुपालकांना विविध योजनांची माहिती शासनाकडून देण्यात येणार आहे. याच शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी पशुसंवर्धनाशी संबंधीत अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
योजनांसाठी मागविण्यात आले होते अर्ज
अहमदनगर पशूसंवर्धन विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्या दूध काढणी यंत्र योजनेसाठी 14 तालुक्यातून 3 हजार 313 अर्ज विभागाला प्राप्त झाले होते. या योजनेसाठी जिल्हा परिषदेकडून 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लाभार्थ्यांना दूध काढणी यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या एकूण किंमतीच्या 60 टक्के किंवा जास्ती जास्त 15 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
मुक्तसंचार गोठा अनुदान योजनेसाठी 15 लाख रुपयांची तरतूद पशूसंवर्धन विभागाकडून करण्यात आली होती. या योजनेत लॉटरी पध्दतीने 75 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली या योजनेत पशुपालकांना खर्चाच्या 50 टक्के प्रमाणे 20 हजार रुपये प्रत्येकी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्हाभरातून 3 हजार 464 अर्ज प्राप्त झाले होते.
कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी ठरले लाभार्थी
अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या दूध काढणी यंत्र योजनेसाठई 133 आणि मुक्त गोठा योजनेसाठी 75 लाभार्थी मिळून एकूण 208 शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे. कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी ठरले ते आपण जाणून घेऊ.
· अकोले जिल्ह्यातून दूध काढणी यंत्र 8 लाभार्थी आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 5 लाभार्थी ठरले. ,
· जामखेड येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 7 लाभार्थी आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 4 लाभार्थी ठरले
· कर्जत येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 11 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 6 लाभार्थी ठरले
· कोपरगाव येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 6 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 3 लाभार्थी ठरले
· नगर येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 12 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 7 लाभार्थी ठरले
· नेवासा येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 12 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 7 लाभार्थी ठरले
· पारनेर येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 11 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 6 लाभार्थी ठरले
· पाथर्डी येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 9 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 5 लाभार्थी ठरले
· राहाता येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 6 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 4 लाभार्थी ठरले
· राहुरी येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 12 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 7 लाभार्थी ठरले
· संगमनेर येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 14 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 8 लाभार्थी ठरले
· शेवगाव येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 8 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 4 लाभार्थी ठरले
· श्रीगोंदा येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 11 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 6 लाभार्थी ठरले
· श्रीरामपूर येथून दूध काढणी यंत्र योजनेसाठी 6 आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी 3 लाभार्थी ठरले