महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्याचे जाहिर केले तेव्हा महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले. आणि आता या सर्व महिला त्यांच्या खात्यात योजनेचा 1500 रुपये कधी येणार आहेत याची वाट पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊ हे पैसे खात्यात कधी येणार आणि कोणत्या महिला ठरणार लाभार्थी!!!

15 ऑगस्टपुर्वी महिलांच्या खात्यात येणार 1500 रुपये
15 ऑगस्ट या दिवशी संपुर्ण भारत देश स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या राज्यातून स्वतंत्र झाला. परंतु यावेळी मात्र महाराष्ट्रातील अनेक महिला आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणार आहोत. तेही 15 ऑगस्टच्या आधी. कारण लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचे 1500 रुपये 15 ऑगस्टच्या आधीच खात्यात जमा होणार आहेत.
यांच्याच खात्यात जमा होतील पैसे
दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली, त्यानंतर दोन दिवसांतच शासन निर्णय देखील काढण्यात आला. 1 जुलै 2024 पासून अर्जदार महिलांचे अर्ज घेण्यास सुरुवात झाली. या दरम्याने ज्या महिलांनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात अर्ज केले व शासकीय छाननीत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 15 ऑगष्टपूर्वी दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
अर्ज छाननी 31 ऑगस्टपर्यंत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट ही ठरविण्यात आली आहे. कारण त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणूकीची आचार संहिता जाहिर होणार आहे. त्यामुळे या योजनेचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंच तपासले जाणार आहेत. आणि पात्र महिलांना योजनेत सामिल करुन घेण्यात येणार आहे.
तुम्ही अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करु शकता. अर्ज छाननी प्रक्रियेत तुमच्या अर्जाचा मान्यता मिळाल्यानंतर तुम्हाला दरमहिना 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. वर्षभरानंतर तुमच्या खात्याची KYC करावी लागेल. कारण हे प्रत्येक शासकीय योजनेच्या लाभासाठी करावे लागते.