
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 2018 पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचे लाभार्थी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्यी कुटुंबाला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच भारतभर राज्यनिहाय ज्या शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेता येतील त्या रुग्णालयांची यादी देखील या शासनाने जाहीर केली आहे. तसेच कोणकोणत्या आजारांसाठी ही योजने लागू होते ते देखील या योजनेच्या नियमांतर्गत ठरविण्यात आले आहे. चला तर मग आयुष्यमान भारत योजनेबाबत अधिक माहिती मिळवूया.
संकेतस्थळाला भेट द्या
https://abdm.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
सरकारकडून लाभार्थ्यांना मिळेल ‘गोल्डन कार्ड
सुरुवातीला केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांनाच या योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी होती परंतु आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. jan arogya yojana’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड देत आहे ज्याच्या मदतीने नागरिक योग्य वैद्यकीय सेवा मिळवू शकतील आणि त्यांच्यावर कोणताही आर्थिक दबाव येणार नाही. म्हणूनच आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकता.
कोण करु शकतो अर्ज?
आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचे नाव SECC–2011 मध्ये असणे आवश्यक आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
- सर्वप्रथम mera.pmjay.gov.in लिंकवर क्लिक करुन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
- लॉगीन केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येई हा ओटीपी स्क्रीनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
- आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
- तुमच्या राज्याचा पर्याय निवडा.
- मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाका.
- तुम्ही लाभार्थी असाल तर समोर ओपन झालेल्या पेजच्या उजव्या बाजूला तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
- तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
- तुमच्या परिसरातील सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र अशा नागरिकांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या शासकीय केंद्रांच्या मदतीने देखील तुम्ही तुमचे नाव आयुषमान भारत योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तपासू शकता. तुमचे नाव त्या यादीमध्ये नसेल तर तत्काळ तुम्ही योजनेसाठी अर्ज देखील करु शकता.