Crop Insurance | आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. येथील निम्म्याहून अधिक नागरिक शेती विकासावर अवलंबून आहेत. तसेच शेती करणे ही सोपी गोष्ट नाही. शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळेच सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. अनेकदा निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची हानी होते. यासाठीच देशात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ (Pm Crop Insurance Scheme) राबवण्यात येत आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांना 197 कोटींचा विमा मंजूर
आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2024 मध्ये खरीप पिकाचे नुकसान झाले होते. आता याच पीक नुकसानपोटी शेतकऱ्यांना एकाच ट्रीगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. या ट्रीगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 197 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. हा पिक विमा शेतकऱ्यांना 23 एप्रिलला मंजूर झाला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विमा
शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. तसेच या पीक विम्याची रक्कम मंजूर झाली असून अद्याप ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. तसेच लवकरच ही पिक विम्याची 4 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या जालना जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे देखील काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची ही रक्कम जमा झाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी खालील गोष्टींचे पालन करावे
- पिक विम्याची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते सक्रिय असणे गरजेचे आहे.
- त्याचबरोबर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डला लिंक असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याने आपल्या शेती पिकाचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण केलेले असावे.
- तसेच शेतकऱ्याने आपल्या झालेल्या शेती पिकाचे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे गरजेचे आहे.